कन्नड तहसील कार्यालयासमोर नगरपालिकेची जुनी इमारत पत्त्यासारखी कोसळली   

छत्रपती संभाजीनगर : सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारतींकडे जाणे टाळणे आवश्यक आहे. कन्नड शहरात इमारत कोसळण्याची घटना घडली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातीन कन्नड शहरात एक इमारत पत्त्यांसारखी कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे ही इमारत कन्नड नगरपालिकेची इमारत आहे. तसेच कन्नड तहसील कार्यालयाच्या अगदी समोर ही इमारत आहे.
 
कन्नड तहसील कार्यालयाचे कामकाज आज नेहमीप्रमाणे सुरु होते. या दरम्यान आज दुपारच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या अगदी समोर असलेली जुनी इमारत कोसळली.इमारत कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली. ही इमारत कन्नड नगरपालिकेची होती. इमारतीच्या खाली दुकाने आहेत. इमारतीच्या तळमजल्याला बरेच गाळे आहेत. सुदैवाने इमारतीचा जो भाग खाली कोसळला त्या परिसरातील दुकानीच गाळे बंद होती. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
 
इमारत कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचे दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. इमारतीचा काही भाग पत्त्यांसारखा जमिनीवर कोसळतो. त्यामुळे परिसरात मोठी धूळ निर्माण होते. ही धूळ बाजूला झाल्यानंतर समोर पडलेली इमारत दिसते. यावेळी पोलीस आजूबाजूच्या दुकानात असलेल्या लोकांना बाहेर काढतात.अचानक अशा प्रकारची घटना घडल्यामुळे नागरीक देखील भयभीत होतात. नगरपालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांकडून इमारत रिकामी करण्याचे काम करण्यात आले. या दरम्यान परिसरात बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली.
 
या घटनेचे व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडिओत घटनेचा थरार अतिशय अचूकपणे कैद झाला आहे. सुदैवाने इमारत कोसळली त्या भागाची दुकानं बंद होती. पण त्याच इमारतीच्या पहिल्या मजल्यावर काही लोक होते. घटना घडत असताना पहिल्या मजल्यावरच्या काही जणांनी तातडीने जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. त्यामुळे ती बचावली. संबंधित इमारत धोकादायक होती का? आणि असेल तर मग तिथे दुकाने कशी सुरु होती? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
 

Related Articles