E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
निवडणूक आयोगाच्या आदेशाकडे इच्छुकांच्या नजरा
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
प्रभाग चार की तीन सदस्यीय असणार याकडे सर्वांचे लक्ष
पिंपरी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्या आदेशाला महिना होत आला तरी, अद्याप त्याबाबतची अधिसूचना निवडणूक आयोगाने काढलेली नाही. त्यामुळे निवडणूक कधी होणार, याबाबत माजी नगरसेवकांसह इच्छुकांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे. आयोगाच्या आदेशाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची फेब्रुवारी २०२२ मध्ये मुदत संपली. त्यापूर्वी २०१७ मध्ये निवडणूक होऊन महापालिकेत भाजपची सत्ता आली. भाजपची पाच वर्ष सत्ता असताना २०२१ पासून शहरातील तत्कालीन नगरसेवक व इच्छुकांनी आपआपल्या प्रभागात जोरदार तयारी सुरू केली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे महापालिका १२ मार्च २०२२ रोजी बरखास्त झाली. महापालिकेत १३ मार्च २०२२ पासून प्रशासकीय राजवट लागली. सव्वातीन वर्षापासून महापालिकेत आयुक्तांच्या माध्यमातून प्रशासकीय कारभार सुरू आहे.
आता ओबीसी आरक्षणाबाबत २०२२च्या आधीची परिस्थिती कायम ठेवत चार महिन्यांत महापालिकेच्या निवडणुका घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने महिन्याभरापूर्वी दिले. निवडणुकीबाबत चार आठवड्यातच नोटिफिकेशन काढा, असेही आदेशात म्हटले होते. मात्र एक महिन्यानंतरही अद्याप निवडणूक आयोगाने अधिसूचना न काढल्याने शहरातील इच्छुकांचे टेन्शन वाढले आहे. इच्छुकांनी तयारी सुरू केलेली असताना दुसरीकडे निवडणुकीबाबत स्पष्टता येत नसल्याने संभ्रम वाढला आहे. प्रभागरचना नेमकी कोणती राहणार, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहे. विशेषतः २०१७ च्या चार सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे की २०२२ मधील केलेल्या तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार निवडणुका होणार, याकडे इच्छुक, माजी नगरसेवक व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
राजकीय इच्छुक, पक्षांचे स्थानिक नेते यांच्याकडून सावध हालचाली केल्या जात आहे. प्रभाग रचनेबाबतची स्पष्टता येत्या काही दिवसात स्पष्ट होईल, असा दावा केला जात आहे. तोपर्यंत शहरातील प्रमुख आणि महायुती आणि महाविकास आघाडीतील नेत्यांनी पडद्यामागे हालचाली सुरू ठेवल्या आहेत. पुढील काही दिवसांत निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जाहीर झाल्यानंतरच कोणता प्रभागात कोणता पक्ष कोणाच्या विरोधात लढेल, हे स्पष्ट होईल.
निवडणूक घोषणेची प्रतीक्षा
प्रभाग रचनेबाबत अनिश्चितता कायम असली तरी इच्छुकांनी मतदारांशी संपर्कात राहण्यासाठी कार्यक्रम सुरू ठेवले आहेत. काहीजण खर्चावर मर्यादा ठेवत मैदानात सक्रिय आहेत, तर काही माजी नगरसेवक अजूनही शांतपणे परिस्थितीचा अंदाज घेत आहेत. इच्छुकांमध्ये वर्गणी, कार्यकर्ता सन्मान, प्रचार साहित्य यावर होणार्या खर्चाबाबत चिंता आहे. त्यामुळे निवडणुकीचा अधिकृत बिगुल वाजेपर्यंत बहुतांश इच्छुक थांबण्याच्या धोरणावर कायम आहेत.
आयोगाकडून सूचना मिळताच कार्यवाही
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुका घेण्याबाबत निवडणूक आयोग तसेच राज्य शासनाकडून काही सूचना अद्याप प्राप्त झालेली नाही. आयोगाकडून सूचना मिळताच त्यानुसार महापालिकेकडून कार्यवाही सुरू केली जाईल, असे पालिकेचे सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.
महायुती होण्याची शक्यता कमीच
पिंपरी-चिंचवड शहरात महायुतीतील भाजपाचे प्राबल्य आहेत. महापालिकेत भाजपाचे ७७ नगरसेवक होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६ नगरसेवक होते. अधिकाधिक इच्छुकांना संधी मिळावी म्हणून भाजपाकडून महायुती न लढण्याच्या मनस्थितीत आहे. भाजपा स्वबळावर लढणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडेही (अजित पवार गट) इच्छुकांची संख्या मोठी असल्याने त्यांनीही स्वतंत्रपणे लढण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेनाला (शिंदे गट) स्वतंत्रपणे लढावे लागणार आहे. आरपीआयला भाजपच्या कोट्यातून काही जागा मिळू शकतील. महायुती होणार नसल्याने पर्यायाने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस, आप हेदेखील आपल्या क्षमतेनुसार लढण्याची तयारी करीत असल्याचे चित्र आहे. त्यादृष्टीने प्रत्येक पक्षात बैठकांचे सत्र सुरू आहे.
Related
Articles
महिलेवर अत्याचार करुन खून करणार्यास जन्मठेप
04 Jul 2025
कोण आहेत जोहरान ममदानी ?
01 Jul 2025
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
04 Jul 2025
वाहनाच्या धडकेत पादचारी तरूणाचा मृत्यू
02 Jul 2025
लाच मागणार्याला अटक
03 Jul 2025
खंबाटकी घाटात मालमोटारीला आग
06 Jul 2025
महिलेवर अत्याचार करुन खून करणार्यास जन्मठेप
04 Jul 2025
कोण आहेत जोहरान ममदानी ?
01 Jul 2025
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
04 Jul 2025
वाहनाच्या धडकेत पादचारी तरूणाचा मृत्यू
02 Jul 2025
लाच मागणार्याला अटक
03 Jul 2025
खंबाटकी घाटात मालमोटारीला आग
06 Jul 2025
महिलेवर अत्याचार करुन खून करणार्यास जन्मठेप
04 Jul 2025
कोण आहेत जोहरान ममदानी ?
01 Jul 2025
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
04 Jul 2025
वाहनाच्या धडकेत पादचारी तरूणाचा मृत्यू
02 Jul 2025
लाच मागणार्याला अटक
03 Jul 2025
खंबाटकी घाटात मालमोटारीला आग
06 Jul 2025
महिलेवर अत्याचार करुन खून करणार्यास जन्मठेप
04 Jul 2025
कोण आहेत जोहरान ममदानी ?
01 Jul 2025
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
04 Jul 2025
वाहनाच्या धडकेत पादचारी तरूणाचा मृत्यू
02 Jul 2025
लाच मागणार्याला अटक
03 Jul 2025
खंबाटकी घाटात मालमोटारीला आग
06 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
विरोधानंतर माघार (अग्रलेख)
3
तेलंगणात कारखान्यातील स्फोटात १२ जणांचा मृत्यू
4
कोण आहेत जोहरान ममदानी ?
5
जनमताच्या रेट्यापुढे सरकारची माघार!
6
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही