वाहनाच्या धडकेत पादचारी तरूणाचा मृत्यू   

विश्रांतवाडी : रस्ता ओलांडणार्‍या पादचार्‍याला भरधाव वेगाने आलेल्या वाहनाने धडक दिली.या अपघतात एका तरूणाचा मृत्यू झाला.ही घटना विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आळंदी रस्त्यावर घडली.या अपघातात सलीम शेख (वय १९, रा. फुलेनगर, येरवडा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. 
 
या प्रकरणी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सलीम शेख याचा मोठा भाऊ अकबर (वय ४५) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  सलीम विश्रांतवाडी  येथील परिसरात  रस्त्याने निघाला होता. या दरम्यान रस्ता ओलांडताना  भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तत्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र  उपचारादरम्यान सलीमचा मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या वाहनचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करत आहेत.

Related Articles