E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लक्ष्मी रस्त्यावर झोपडपट्टी दाखवून साडेचारशे कोटींचा गैरव्यवहार
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर यांचा आरोप
पुणे : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून (एसआरए) पुणे महापालिकेच्या हद्दीतील आणि शहरातील जुने वाडे हे झोपडपट्टी सदृश असल्याचे जाहीर करून झोपडपट्टी पुनर्वसन योजना जाहीर राबविण्याचा घाट घातला आहे. या प्रकरणी एसआरएकडून एका वर्तमान पत्रात जाहिरात देखिल प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे साडेचारशे कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचा ’आरोप आपले पुणे’ या संस्थेकडुन करण्यात आला आहे.
लक्ष्मी रस्त्यावरील वाड्याची इमारत असून ती झोपडपट्टी जाहीर करून टीडीआर काढण्याचा आणि एफएसआय जास्त करण्याचा प्रयत्न चालू आहे. हा प्रकल्प म्हणजे एसआरएच्या माध्यमातून केला जाणारा सुमारे साडेचारशे रुपयांचा गैरव्यवहार असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी केला आहे.
महापालिकेचे माजी आयुक्त कुणाल कुमार यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून विशिष्ट तक्त्यात ठराविक मुद्यांबाबत क्षेत्रीय कार्यालयाकडून झोपडपट्टी सदृश्य अहवाल शिर्षकाखाली केवळ विशिष्ट तपशील मागवून अशा जागा त्या आधारावर झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करणे, त्यावर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण नियमावलीनुसार रहिवासी भाडेकरूंना झोपडपट्टीधारक म्हणून विनामोबादला सदनिका, गाळे देणे, त्यापोटी विकसकास मोठ्या प्रमाणात चटई क्षेत्राचा (टीडीआर) मोबदला देणे याबाबी होत असल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास येत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर एसआरएला असे कळविण्यात आले होते की, ज्या प्रकरणांमध्ये पुणे पालिकेकडून अहवाल पाठविण्यात आलेले आहेत, परंतु झोपडपट्टी पुनर्वसन प्राधीकरणाकडून अध्याप प्रस्ताव मान्य करण्यात आलेले नाहीत, असे सर्व प्रस्ताव स्थगित करण्यात यावेत व त्या सर्व प्रकरणांचा अहवाल सादर करण्यात यावा. परंतु या आदेशाचा एसआरएला विसर पडला का, पालिकेने स्थगिती दिल्यानंतर एसआरएकडून या भागातील वाड्यांच्या ठिकाणी एसआरए प्रकल्प राबविण्याचा घाट का घातला जात आहे. शहरातील जूने वाडे म्हणजे झोपडपट्टी नाही. असे असताना देखील साडेचारशे कोटी रुपये घश्यात घालण्यासाठी हा खेळ खेळला जात असल्याचा आरोप केसकर यांनी केला आहे.
पालिकेने स्थगिती दिल्यानंतरी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे यांच्याकडे हा प्रकल्प रेटून पुढे घेवून जाण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे गटणे याच्या बदली करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण हे सध्या झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्राधिकरण न राहता फक्त पुणे शहरातील जुने वाडे आणि इमारती यांच्या पुनर्वसनासाठी बनलेले प्राधिकरण आहे. झोपडपट्टी सदृश्य असा अभिप्राय वॉर्ड ऑफिसरच्या माध्यमातून त्यांच्या अभियंत्याकडून घेतात आणि जुने वाडे हे झोपडपट्टी सदृश असल्याचे जाहीर करून झोपडपट्टी पुनर्वसन योजना जाहीर करतात. असा आरोप माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे, संजय बालगुडे यांनी केला होता. याकडे माजी आयुक्त विक्रम कुमार यांनी गंभीरपणे लक्ष दिले होते. त्यानंतर त्यांनी तात्काळ या प्रकल्पास स्थगितीचे आदेश दिले होते. तसेच एक समिती नेमली होती, त्या समितीच्या समोर एस आर ए यांनी काही अहवाल सादर केला, त्यावर समितीने निर्णय करायचा आहे हे चालू असतानाच हा देखील प्रस्ताव करण्याचा प्रयत्न जोरदार चालू आहे. ही बाब केसकर यांनी पालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम यांच्या निर्देशनास आणली आहे.
माजी नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना मागणी केली होती की, अभिप्रायामुळे पालिकेचे नुकसान आहे. कारण पालिकेला विकास शुल्क मिळत नाही. विकासकाला शुल्क भरावे लागत नाही आणि टीडीआर विकून करोडो रुपये मिळतात. त्यामुळे पालिकेच्या वार्ड रचनेतील अभियंत्यांना हाताशी धरून हे सगळे षडयंत्र चालू आहे. पालिकेच्या पेठांच्या मध्ये जवळपास २० हजार वाडे आहेत, त्यांचा विचार केला तर हा ५० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांनी पालिका आयुक्त यांना विनंती केली होती की आयुक्तांच्या परवानगीशिवाय कुठल्याही अभियंत्याने झोपडपट्टी सदृश्य असा अभिप्राय देऊ नये. त्यानुसार माजी आयुक्तांनी आदेश जारी केले होते.
लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेले प्रश्न
बुधवार पेठे मधील घर क्रमांक २७६अ, २७७ ब, २७९, २८०, २८१, २८२, ८५३, ८५३ या ठिकाणी पीएमपीचे वाहनतळ राखीव आहे.
२७७ (अ) (ब) मुजावर वाडा १०,००० चौरस फुटाचा असून काही भाग पडला आहे, भाडेकरू बाहेर राहायला गेली आहे तर वीस लोक तिथेच राहतात.
२७९ बुधवार पेठ वीस वर्षांपूर्वी पालिकेने ताब्यात घेतला, त्या ठिकाणी आरोग्याची कोठी आहे. तेथील भाडे करूनचे पुनर्वसन दत्तवाडी येथे केले आहे.
२८० ठकार वाडा हा जमीन दोस्त झालेला आहे. आठ-दहा भाडेकरू बाहेर राहतात.
२८१ जोशी वाडा राजकुमार अग्रवाल यांच्या मालकीचा आहे.
२८२ बुधवार पेठ राजकुमार अग्रवाल बन्सीलाल यांच्या मालकीची असून त्या ठिकाणी तीन मजली पक्की इमारत आहे.
८५३ बुधवार पेठ पिंगळे ढेरे फिरोज भाई हे दुकानदार दोन भाडेकरी इमारत मोडकळीस आली आहे पार्किंगचे आरक्षण आहे.
८५४ बुधवार पेठ वाडेकर बंधू गीता विहार पॉप्युलर वॉच पूर्ण पोशात लक्ष्मी रोड फेसिंग असून वाहनतळाचे आरक्षण आहे.
Related
Articles
‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा
08 Jul 2025
झारखंडमध्ये कोळसा खाणीचा भाग कोसळला
06 Jul 2025
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानातील कामकाज करणार बंद
05 Jul 2025
माजी सरन्यायाधीशांना बंगला सोडण्याची सूचना
07 Jul 2025
रघुवीर घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच
09 Jul 2025
बी. फार्मसी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २१ जुलैला
06 Jul 2025
‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा
08 Jul 2025
झारखंडमध्ये कोळसा खाणीचा भाग कोसळला
06 Jul 2025
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानातील कामकाज करणार बंद
05 Jul 2025
माजी सरन्यायाधीशांना बंगला सोडण्याची सूचना
07 Jul 2025
रघुवीर घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच
09 Jul 2025
बी. फार्मसी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २१ जुलैला
06 Jul 2025
‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा
08 Jul 2025
झारखंडमध्ये कोळसा खाणीचा भाग कोसळला
06 Jul 2025
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानातील कामकाज करणार बंद
05 Jul 2025
माजी सरन्यायाधीशांना बंगला सोडण्याची सूचना
07 Jul 2025
रघुवीर घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच
09 Jul 2025
बी. फार्मसी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २१ जुलैला
06 Jul 2025
‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा
08 Jul 2025
झारखंडमध्ये कोळसा खाणीचा भाग कोसळला
06 Jul 2025
मायक्रोसॉफ्ट पाकिस्तानातील कामकाज करणार बंद
05 Jul 2025
माजी सरन्यायाधीशांना बंगला सोडण्याची सूचना
07 Jul 2025
रघुवीर घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच
09 Jul 2025
बी. फार्मसी प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २१ जुलैला
06 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
2
थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण
3
कोरोना लस आणि हृदयविकाराचा कोणताही संबंध नाही
4
असुरक्षित शिक्षण संस्था (अग्रलेख)
5
रशियाच्या कारखान्यावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला
6
जीएसटी संकलनात घट