झारखंडमध्ये कोळसा खाणीचा भाग कोसळला   

एकाचा मृत्यू; काही जण अडकल्याची भीती

रामगढ : झारखंडमधील रामगढ जिल्ह्यात बेकायदेशीर खाणकाम करताना कोळसा खाणीचा काही भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. तर, काही जण अडकले असल्याची भीती पोलिसांनी शनिवारी व्यक्त केली.जिल्ह्यातील कर्मा परिसरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. मदत आणि बचाव कार्यासाठी प्रशासकीय पथक पाठवण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. 
 
आतापर्यंत एक मृतदेह बाहेर काढण्यात आला असून बचाव कार्य सुरू आहे. आणखी काही जण अडकल्याचा संशय आहे, असे पोलिस अधिकारी आशुतोष कुमार सिंह यांनी सांगितले. काही ग्रामस्थ त्या ठिकाणी कोळशाच्या बेकायदेशीर उत्खननात सहभागी होते, असे रामगढचे उपायुक्त फैज अक अहमद मुमताज यांनी सांगितले.या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पथक घटनास्थळी पाठवण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.

Related Articles