‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा   

‘आरटीओ’चे नागरिकांना आवाहन

पुणे : जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी (एचएसआरपी) लावण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरच शुल्क भरण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) करण्यात आले आहे.
 
‘रोझ मार्टा कंपनी’च्या नावाने बनावट संकेतस्थळाद्वारे नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचे ठिकठिकाणी गुन्हे दाखल केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आरटीओ अधिकारी स्वप्नील भोसले यांनी सोमवारी पत्रक काढून नागरिकांना http://transport.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच शुल्क भरण्याचे आवाहन केले.
 
परिहवन विभागाच्या निर्देशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना उच्च सुरक्षा क्रमांकाची पाटी लावण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. पुणे शहरात सुमारे २०० हून अधिक केंद्रे सुरू आहेत, तरी वाहनधारकांनी उच्च सुरक्षा क्रमांक पाटी मुदतीत बसवून घ्यावी, असेही पत्रकात नमूद केले आहे.
 

Related Articles