E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वायव्य भारतात मान्सूनची प्रगती
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
देशभरात पावसाचे पुनरागमन; कोकण, मध्य महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट
पुणे
: राज्यासह देशभरात मान्सूनचे पुनर्रागमन झाले आहे. येत्या १० ते १२ दिवसांत वायव्य भारताचा बहुतांश भाग मान्सूनने व्यापणार असल्याच्या अंदाज आहे. तसेच पुढील दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिजोरदार पावसाचा इशारा कायम आहे. त्यामुळे या भागाला रेड अलर्ट देण्यात आला आहे. मागील २४ तासात देशातील विविध भागात जोरदार पाऊस पडला आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार मान्सूनने देशाच्या विविध भागांत प्रगती केली आहे. येत्या २५ जूनपर्यंत वायव्य भारताचा संपूर्ण बहुतांश भाग मान्सूनने व्यापणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या २४ तासात कर्नाटक किनारपट्टी, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कर्नाटकातील कारवार येथे सर्वाधिक २४२ मिमी पावसाची नोंद झाली. मान्सूनची सद्य:स्थितीतील प्रगती समाधानकारक असून मान्सून वेळेवर वायव्य भारताच्या दिशेने सरकत आहे. मान्सूनच्या प्रगतीमुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला असून पेरण्यांच्या कामाला वेग आला आहे.
येत्या ३८ तासात विदर्भाचा आणखी काही भाग, छत्तीसगड, ओडिसाच्या भागात मान्सून प्रगती करणार आहे. तसेच पुढील तीन दिवसांत गुजरातचा काही भाग, झारखंड, बिहारचा काही भागात मान्सून वाटचाल करण्यास परिस्थिती अनुकूल आहे. वार्याची द्रोणीय रेषा वायव्य राजस्तान येथील चक्रीय स्थितीपासून मध्य प्रदेश तसेच मध्य विदर्भातून जात आहे. पुढील काही दिवस कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि वादळी वार्यासह अत्यत जोरदार पाऊस म्हणजेच २४ तासात २०४ मिमी पेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
आज (शनिवारी) ठाणे, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली मेघगर्जना, वीजांचा कडकडाटासह सोसाट्याच्या वार्यासह तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडणार आहे. या जिल्ह्यांना ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यात पुढील दोन दिवस मेघगर्जना आणि वादळी वार्यासह पाऊस पडणार आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मागील २४ तासातील देशातील पाऊस
ठिकाण
पाऊस
कारवार
२४२ मिमी
होनावर
१२१ मिमी
पणजी
९१ मिमी
कोल्हापूर
६९ मिमी
अंदमान
५७ मिमी
लक्षद्वीप
५७ मिमी
मिझोराम
४७ मिमी
रत्नागिरी
४१ मिमी
केरळ
४१ मिमी
Related
Articles
नागपूर रेल्वे स्थानकात पाणीच पाणी; रस्ते बुडाले, बंद वाहतूक
09 Jul 2025
जादूटोण्याच्या संशयाने एकाच कुटुंबातील ५ जणांना जाळले
09 Jul 2025
डॉ. नवलगुंदकर यांना श्रद्धांजली
08 Jul 2025
हो मी पाकिस्तानी सैन्याचा हस्तक होतो
07 Jul 2025
दरड कोसळून मुलीचा मृत्यू
11 Jul 2025
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दुटप्पी भूमिका
09 Jul 2025
नागपूर रेल्वे स्थानकात पाणीच पाणी; रस्ते बुडाले, बंद वाहतूक
09 Jul 2025
जादूटोण्याच्या संशयाने एकाच कुटुंबातील ५ जणांना जाळले
09 Jul 2025
डॉ. नवलगुंदकर यांना श्रद्धांजली
08 Jul 2025
हो मी पाकिस्तानी सैन्याचा हस्तक होतो
07 Jul 2025
दरड कोसळून मुलीचा मृत्यू
11 Jul 2025
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दुटप्पी भूमिका
09 Jul 2025
नागपूर रेल्वे स्थानकात पाणीच पाणी; रस्ते बुडाले, बंद वाहतूक
09 Jul 2025
जादूटोण्याच्या संशयाने एकाच कुटुंबातील ५ जणांना जाळले
09 Jul 2025
डॉ. नवलगुंदकर यांना श्रद्धांजली
08 Jul 2025
हो मी पाकिस्तानी सैन्याचा हस्तक होतो
07 Jul 2025
दरड कोसळून मुलीचा मृत्यू
11 Jul 2025
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दुटप्पी भूमिका
09 Jul 2025
नागपूर रेल्वे स्थानकात पाणीच पाणी; रस्ते बुडाले, बंद वाहतूक
09 Jul 2025
जादूटोण्याच्या संशयाने एकाच कुटुंबातील ५ जणांना जाळले
09 Jul 2025
डॉ. नवलगुंदकर यांना श्रद्धांजली
08 Jul 2025
हो मी पाकिस्तानी सैन्याचा हस्तक होतो
07 Jul 2025
दरड कोसळून मुलीचा मृत्यू
11 Jul 2025
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दुटप्पी भूमिका
09 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
मस्क यांचा नवा पक्ष
2
टेक्सासमध्ये महापूर; ५२ जणांचा मृत्यू
3
अकरावी प्रवेशाची दुसरी फेरी सुरू
4
विद्यार्थ्यांच्या गळतीकडे गांभीर्याने पाहाण्याची गरज
5
धरण क्षेत्रात धुव्वाधार
6
मराठीसाठी शक्तिप्रदर्शन (अग्रलेख)