पाटणा : जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळण्यात आल्याची घटना बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील तेतमा गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका १६ वर्षीय मुलाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पूर्णियाचे पोलिस उपमहानिरिक्षक प्रमोद कुमार मंडल म्हणाले, ’प्राथमिक तपासात असे दिसून आले की, तेतमा गावातील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांची जादूटोणा करत असल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्यांचे मृतदेह झुडपात जाळले असल्याचे पोलिस अधिकारी मंडल सागितले. हत्येनंतर मृतदेह कुठेतरी लपवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत असून फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या पथकाच्या मदतीने शोधकार्य सुरु आहे.
Fans
Followers