दरड कोसळून मुलीचा मृत्यू   

जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील डोंगराळ भागात गुरुवारी पावसामुळे दरड कोसळली. यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली.मेंढर तालुक्यातील चक बोनाल्ला परिसरात ही घटना घडली. आफिया कौसर असे मृत मुलीचे नाव आहे. ती १२ वर्षांची होती, असेही अधिकार्‍यांनी सांगितले.
 
दोन दिवसांपासून काश्मीरच्या अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे उष्णतेच्या लाटेपासून स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.हवामान खात्याने काश्मीर खोर्‍यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तसेच, दरडी कोसळण्याच्या घटना घडू शकतात, अशी शक्यता वर्तविली आहे.

Related Articles