E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
नागपूर रेल्वे स्थानकात पाणीच पाणी; रस्ते बुडाले, बंद वाहतूक
Samruddhi Dhayagude
09 Jul 2025
नागपूर : विदर्भात गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने नागपूर शहराला झोडपून काढले आहे. विशेषतः मंगळवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील बऱ्याच भागात पाणी साचले असून नागपूर रेल्वे स्थानकातही पाणी साचले आहे.
रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. १ आणि २ वर पाणी साचले असून प्रवाशांना चिखल आणि साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. काही गाड्यांना उशीर झाला, काही गाड्यांचे रूट बदलले तर काही वेळेस गाड्यांना थांबवावे लागले. त्यामुळे हजारो प्रवाशांना समस्येला सामोरे जावे लागत आहे. स्टेशन परिसरातल्या दुकानांमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
शहराच्या विविध भागांमध्ये जसे की शंकरनगर, धरमपेठ, रमन विज्ञान केंद्राजवळ आणि झिंगाबाई टाकळी भागात रस्ते, घरांचे तळमजले, आणि सोसायट्यांची पार्किंग पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. अग्निशमन दल आणि नागपूर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून पाणी उपसण्याचे प्रयत्न सुरु आहेत, मात्र मुसळधार पावसामुळे ही कामे करतांना अडचण येत आहे.
महापालिकेकडून सांगण्यात आले की, शहरात जवळपास २० ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या असून काही भागात वीजपुरवठाही खंडित केला आहे. नागपूरच्या सखल भागात विशेषतः मानकापूर, बुटीबोरी आणि इतर उपनगरांमध्ये नागरिकांना हलवण्यासाठी बोटीद्वारे बचावकार्य करण्यात येत आहे.भारतीय हवामान खात्याने नागपूरसाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला असून अजून काही दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. शहरात आतापर्यंत २०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे.
Related
Articles
मिळकत कराचे दीड हजार धनादेश बाउन्स
25 Jul 2025
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे परतीच्या वाटेवर पिंपरीत स्वागत
20 Jul 2025
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात ४० अब्ज डॉलरवर
19 Jul 2025
कल्याणमध्ये मुलीला परप्रांतीयांकडून मारहाण
24 Jul 2025
आशिम कुमार घोष हरयानाचे राज्यपाल
22 Jul 2025
संसदेतील गदारोळ कायम
24 Jul 2025
मिळकत कराचे दीड हजार धनादेश बाउन्स
25 Jul 2025
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे परतीच्या वाटेवर पिंपरीत स्वागत
20 Jul 2025
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात ४० अब्ज डॉलरवर
19 Jul 2025
कल्याणमध्ये मुलीला परप्रांतीयांकडून मारहाण
24 Jul 2025
आशिम कुमार घोष हरयानाचे राज्यपाल
22 Jul 2025
संसदेतील गदारोळ कायम
24 Jul 2025
मिळकत कराचे दीड हजार धनादेश बाउन्स
25 Jul 2025
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे परतीच्या वाटेवर पिंपरीत स्वागत
20 Jul 2025
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात ४० अब्ज डॉलरवर
19 Jul 2025
कल्याणमध्ये मुलीला परप्रांतीयांकडून मारहाण
24 Jul 2025
आशिम कुमार घोष हरयानाचे राज्यपाल
22 Jul 2025
संसदेतील गदारोळ कायम
24 Jul 2025
मिळकत कराचे दीड हजार धनादेश बाउन्स
25 Jul 2025
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे परतीच्या वाटेवर पिंपरीत स्वागत
20 Jul 2025
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात ४० अब्ज डॉलरवर
19 Jul 2025
कल्याणमध्ये मुलीला परप्रांतीयांकडून मारहाण
24 Jul 2025
आशिम कुमार घोष हरयानाचे राज्यपाल
22 Jul 2025
संसदेतील गदारोळ कायम
24 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)