E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
प्रत्युत्तर शुल्काच्या अंमलबजावणीस मनाई
Samruddhi Dhayagude
30 May 2025
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना येथील न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. आणीबाणी अधिकार कायद्याअंतर्गत आयातीवरील प्रत्युत्तर शुल्काच्या अंमलबजावणीस न्यायालयाने मनाई केली आहे.
ट्रम्प यांनी एप्रिल महिन्यात जगावर ‘प्रत्युत्तर शुल्क’ लादले होते. यामध्ये भारताचादेखील समावेश होता. विशेष म्हणजे, कॅनडा, रशिया, उत्तर कोरिया, मेक्सिको आणि बेलारुसला अमेरिकेने यातून वगळले होते. ट्रम्प यांच्या ‘प्रत्युत्तर शुल्का’स चीनवगळता अन्य कोणत्याही देशाने प्रत्युत्तर दिले नव्हते. चीननेदेखील अमेरिकेवर आयात शुल्क लावले होते. त्यानंतर, उभय देशांत परस्पर आयात शुल्क वाढीची स्पर्धा सुरु झाली होती. यादरम्यान, ट्रम्प यांनी दोन टप्प्यांत आयात शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली होती.
विशेष म्हणजे ट्रम्प यांनी ’व्हाईट हाऊस’ येथे पत्रकार परिषद घेत ‘प्रत्युत्तर शुल्का’ची घोषणा केली. शुल्कासंदर्भातील फलक त्यांनी स्वतः प्रसारमाध्यमांना दाखवले होते. त्याचे पडसाद जागतिक बाजारपेठेत उमटले होते.
तसेच, ट्रम्प ‘प्रत्युत्तर शुल्का’च्या नावाखाली देशांना व्यापार करारासाठी भाग पाडत होते. ट्रम्प यांच्या निर्णयाविरोधात फेडरल न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. वेगवेगळ्या देशांवर लादलेले शुल्क आर्थिक आणीबाणीला तोंड देण्यासाठी घेतलेला निर्णय असल्याचे अर्जात नमूद करण्यात आले होते. ट्रम्प यांनी अधिकारांचे उल्लंघन केले असून देशाचे व्यापार धोरण त्यांच्या मर्जीवर अवलंबून ठेवले आहे, असा युक्तिवाद करण्यात आला.
Related
Articles
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस
20 Jun 2025
टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश
18 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस
20 Jun 2025
टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश
18 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस
20 Jun 2025
टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश
18 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
जयप्रकाशचे डॉक्टर होण्याचे स्वप्न राहिले अधुरे
15 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस
20 Jun 2025
टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश
18 Jun 2025
हवाई हल्ल्याने तेहरान हादरले
18 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
ठेवींवरील व्याज घटणार
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला