टिमवीच्या धावपटूंचे घवघवीत यश   

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे घेण्यात आलेल्या ‘स्पोर्टीफाय अ‍ॅथलेटिक्स मीट‘ या स्पर्धेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी शानदार कामगिरी केली. यावेळी मुलींमध्ये १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या श्रेया सुर्यवंशी हिने प्रथम क्रमांक मिळविला. तर रिया पोकळे हिने द्वितीय क्रमांकाला गवसणी घातली. तर १०० मीटर मुलांमध्ये प्रथम क्रमांक हा प्रणय घोरपडे तर दुसरा क्रमांक हा यश मंघेलकर याने मिळविला. 
 
त्यानंतर झालेल्या २०० मीटर मुलींच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक हा रिया पोकळे हिने पटकाविला. तर दुसरा क्रमांक सानिका देशमुख हिने मिळविला. तर २०० मीटर मुलांच्या स्पर्धेत पहिला क्रमांकाचा मानकरी अनिश पाटील तर दुसरा क्रमांकाचा आर्यन घुले ठरला. या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन टिमवीचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी केले तर कुलगुरु डॉ.गीताली टिळक यांनी त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

Related Articles