जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी   

जयपूर : जयपूरमधील एका खासगी शाळेला सोमवारी बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली. त्यानंतर, शाळेचा परिसर रिकामा करण्यात आला आणि कसून तपासणी करण्यात आली. सुदैवाने, कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही. ई-मेलद्वारे ही धमकी मिळाली होती. शाळा प्रशासनाने याबाबत तातडीने पोलिसांना कळविले. त्यानंतर, बॉम्ब शोधक आणि बॉम्ब नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकानेदेखील संपूर्ण परिसराची पाहणी केली. त्यानंतर, सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Related Articles