E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
युनूस यांनी अमेरिकेला देश विकला
Wrutuja pandharpure
26 May 2025
माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा घणाघात
नवी दिल्ली : महमद युनूस यांच्या हंगामी सरकारने बांगलादेश अमेरिकेला विकला आहे, असा घणाघात माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी केला आहे.
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत हसीना म्हणाल्या, जेव्हा अमेरिकेला सेंट मार्टिन बेट हवे होते, तेव्हा माझे वडील ते देण्यास सहमत नव्हते. यात त्यांना आपला प्राण गमवावा लागला; परंतु सत्तेत राहण्यासाठी देश विकण्याचा विचार त्यांच्या मनात देखील कधी आला नाही! शेख मुजीबुर रहमान यांच्या आवाहनाला जनतेने प्रतिसाद दिला, शस्त्रे उचलली आणि ते लढले. ३० लाख नागरिकांना मुक्त करण्यासाठी त्यांनी आपले प्राण दिले. त्या देशाची एक इंचही जमीन शेख मुजीबुर यांनी कोणाला दिली नाही. आज युनूस हे बांगलादेशाला अमेरिकेला विकत आहेत हे मोठे दुर्दैव आहे.
महमद युनूस यांनी दहशतवाद्यांच्या मदतीने बांगलादेशात सत्ता काबीज केली, याकडे लक्ष वेधून शेख हसीना म्हणाल्या, यातील अनेक दहशतवादी संघटना अशा आहेत, की त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी आहे. युनूस हे दहशतवाद्यांच्या मदतीने सरकार चालवत आहेत. आम्ही दहशतवाद्यांपासून बांगलादेशाच्या नागरिकांना संरक्षण दिले होते. एका दहशतवादी हल्ल्यानंतर आम्ही कठोर पावले उचलली होती, अनेकांना अटक करण्यात आले होते. पण आज तुरुंग रिकामे झाले आहेत, त्या सर्वांना सोडले आहे, असेही शेख हसीना यांनी म्हटले आहे.
अवामी लीगवरील बंदीवर हसीना काय म्हणाल्या?
बंगाली राष्ट्राचे संविधान दीर्घ संघर्ष आणि मुक्ती युद्धातून मिळाले. पण बेकायदेशीरपणे सत्ता काबीज करणार्या या नेत्याला संविधानाला स्पर्श करण्याचा अधिकार कोणी दिला? त्यांना जनतेचा जनादेश नाही, कोणताही संवैधानिक आधार नाही. मुख्य सल्लागार या पदाला देखील कोणताही आधार नाही आणि ते अस्तित्वात नाही. मग संसदेशिवाय ते कायदा कसा बदलू शकतात? हे बेकायदेशीर असून त्यांनी अवामी लीगवर बंदी घातली आहे, असे शेख हसीना यांनी नमूद केले.
Related
Articles
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
सर्वोत्तम शिक्षण संस्थांच्या यादीत मुंबई विद्यापीठ सतरावे
20 Jun 2025
मोठ्या हॉस्पिटलमध्ये गरजूंवर मोफत उपचार करा
19 Jun 2025
आकुर्डी गावठाणात अतिक्रमणावर पालिकेची कारवाई
16 Jun 2025
खरी शिवसेना कोणती ते शिंदे यांनी दाखवून दिले : शहा
21 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
ठेवींवरील व्याज घटणार
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला