चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू   

चंद्रपूर : चंद्रपूर येथे जंगली हत्तीच्या हल्ल्यात ७० वर्षाच्या  नागरिकांचा मृत्यू झाला. जतलपूर परिसरातील सिंदेवाही परिसरात रविवारी सकाळी हत्तीने हल्ला केला होता. हत्तीने नागरिकांवर हल्ला करण्याची ही जिल्ह्यातील पहिली घटना असल्यामुळे नागरिकांनी चिंता व्यक्त केली. हत्तीच्या हल्ल्यात मारोती मसराम यांचा मृत्यू झाला आहे. ते सकाळी जंगलात गेले होते. तेव्हा त्यांच्यावर हत्तीने हल्ला केला होता. हत्तींचे कळप ओेडिशातून गडचिरोली जिल्ह्यात छत्तीसगढमार्गे आले आहेत. त्यापैकीच एका हत्तीने नागरिकावर हल्ला केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.

Related Articles