भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले   

केजरीवाल यांची टीका

गांधीनगर : भाजपने आपल्या या ३० वर्षांच्या राजवटीत गुजरातला ५० वर्षे मागे नेले आहे. आज गुजरातमध्ये वीज, पाणी, रस्ते, रोजगार नाही. सर्वत्र अराजकता आहे. जगभरात उत्तम रस्ते बांधले जात आहेत; परंतु भाजप ३० वर्षांत एकही रस्ता बांधू शकला नाही. गेल्या २० वर्षांपासून विसावदरच्या नागरिकांनी भाजपाला जिंकू दिले नाही. विसावदरची निवडणूक महाभारतापेक्षा कमी नाही. भाजपकडे पैसा आणि शक्ती आहे, तर आपकडे जनतेचे प्रेम आहे, असे प्रतिपादन आम आदमी पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. गुजरातमधील विसावदर जागेसाठी होणार्‍या पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी खारिया गावात झालेल्या जाहीर सभेत केजरीवाल यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
 
केजरीवाल म्हणाले, राजकोट ते जुनागढ हे रस्त्याचे अंतर १२५ किलोमीटर आहे. राजकोट ते जुनागढ हा रस्ता इतका वाईट स्थितीत आहे की, मला तिथे पोहोचण्यासाठी साडेतीन तास लागले. आज संपूर्ण जग आधुनिक होत आहे, जगभरात उत्कृष्ट रस्ते बांधले जात आहेत, परंतु ३० वर्षे गुजरातवर राज्य करूनही भाजप रस्ते बांधू शकले नाही. 

दर तासाला वीज खंडित

केजरीवाल म्हणाले, गुजरातमध्ये दर तासाला वीज खंडित होते. रविवारी कालसारीला गेलो तेव्हा तिथे वीज नव्हती.  वीज नाही आणि गावांपासून शहरांपर्यंत रस्ते नाहीत. 

Related Articles