मुंबई : क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील सर्वोत्तम २० शिक्षण संस्थाच्या यादीत मुंबई विद्यापीठाला स्थान मिळाले आहे. विद्यापीठाने या यादीत १७ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे, तर आयआयटी-मुंबईची घसरण झाली असून,ते दुसर्या स्थानी गेले आहे. आयआयटी-दिल्लीने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. करेली सायमंड यांनी क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ जाहीर केली आहे. यात जगभरासह देशातील सर्वोत्तम शिक्षण संस्था आणि विद्यापीठांची यादी आहे. जगभरातील शिक्षण संस्थांमध्ये मागील वर्षी मुंबई विद्यापीठ ७११-७२० च्या क्रमवारीत होते. यंदा मुंबई विद्यापीठाने ६६४ व्या स्थानी झेप घेतली आहे, तर राज्यातील पारंपरिक विद्यापीठाच्या यादीत द्वितीय स्थान पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नल्समध्ये मुंबई विद्यापीठाच्या संशोधन पेपर्सची १५६ टक्क्यांंनी वाढ झाली आहे. विद्यापीठाशी सलंग्नित असलेले ८० हून अधिक प्राध्यापक व्यावसायिक कार्यकारणींवर कार्यरत आहेत, असे ही अधिकार्याने सांगितले.
Fans
Followers