E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
हुंड्यातील ५१ तोळे सोने बँकेत गहाण
Wrutuja pandharpure
25 May 2025
पिंपरी
: वैष्णवी प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. तिच्या लग्नावेळी दिलेले ५१ तोळे सोने तिच्या सासर्यांनी फेडरल बँकेत गहाण ठेवल्याचे उघड झाले आहे. हे सोने गहाण ठेवण्यासाठी वैष्णवीची परवानगी घेण्यात आली होती का? की तिचा छळ करून ते जबरदस्तीने घेतले गेले? याचा तपास पोलिस करत आहेत.
वैष्णवी आणि शशांक हगवणे यांचा २०२३ मध्ये प्रेमविवाह झाला होता. लग्नावेळी वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी हगवणे कुटुंबाला ५१ तोळे सोने, ७ किलो चांदीची भांडी, आलिशान मोटार, दुचाकी आणि अन्य किमती वस्तू दिल्या होत्या. एवढे देऊनही हगवणे कुटुंबाच्या अपेक्षा वाढत गेल्या. त्यांनी वैष्णवीच्या वडिलांकडे तब्बल २ कोटींची मागणी केली होती. पैसे न मिळाल्याने वैष्णवीचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरु झाला, असा आरोप तिच्या वडिलांनी फिर्यादीत केला आहे.
आता पोलिस तपासात समोर आले की, लग्नात दिलेले सोने सासरे राजेंद्र तुकाराम हगवणे यांनी फेडरल बँकेत गहाण ठेवले आहे. त्यामागचा उद्देश काय होता? आणि वैष्णवीच्या संमतीशिवाय हे कृत्य करण्यात आले का? याचा तपास सुरू आहे. वैष्णवीचा मानसिक छळ याच कारणांमुळे वाढला का? यावरही आता अधिक चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आलिशान मोटार आणि दुचाकी जप्त केली आहे. सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे घटनेच्या दुसर्या दिवसापासून फरारी होते. पोलिसांना आठ दिवसांनी त्यांच्या मुसक्या आवळण्यात यश आले. पती शशांक हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हगवणे यांना यापूर्वीच अटक झाली आहे. राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राज्य कार्यकारिणी सदस्य असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
१६ मे रोजी वैष्णवी हिने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. उत्तरीय वैद्यकीय तपासणीत तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण सापडले होते. तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर काही महिन्यांतच सासरच्या मंडळींनी वैष्णवीवर संशय घेऊन, तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. तिच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार वाद घालणे, चांदीची भांडी परत मागणे आणि हुंड्याच्या नावाखाली पैशांची मागणी करत छळ सुरू होता. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता आहे. बँकेत गहाण ठेवलेले सोने, त्याची प्रक्रिया तसेच यात गुन्हेगारी हेतु होता का? याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
Related
Articles
देशात कोरोनाचे सहा हजार सक्रिय रुग्ण
20 Jun 2025
आकुर्डी गावठाणात अतिक्रमणावर पालिकेची कारवाई
16 Jun 2025
श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान
16 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी महापालिका सज्ज
19 Jun 2025
शिराळ्यात नागाची पूजा करू देण्याची मागणी
22 Jun 2025
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने बदलले पतौडी चषकाचे नाव : सचिन तेंडूलकर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
4
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले
5
पुण्यातील सराईत गुन्हेगार
6
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख