श्री बाबाजी चैतन्य महाराज पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान   

ओतूर, (वार्ताहर) : जुन्नर तालुक्यातील ओतूर येथून श्री क्षेत्र पंढरपूर पायी वारीसाठी सद्गुरू श्री बाबाजी चैतन्य पालखी सोहळ्याचे प्रस्थान हरिनामाच्या व टाळ-मृदंगाच्या गजरात अतिशय भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी रविवार (१५ जून) मार्गस्थ झाली. यावेळी श्रींचा अभिषेक शंकर भगवत डुंबरे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आला, असे पालखी सोहळ्याचे अध्यक्ष आत्माराम गाढवे व सचिव अनिल तांबे यांनी सांगितले.
 
श्रींच्या पायी दिंडी सोहळ्याचे हे ६५ वे वर्ष असून यावर्षी पालखी रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान ओतूर गावचे प्रगतशील शेतकरी शांताराम महाराज वाकर यांच्या बैलजोडीला मिळाला. यावेळी श्री चैतन्य महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी ओतूरसह परिसरातून हजारो भाविक रिघ लावली होती.
 
आषाढी वारीसाठी सकाळी ११ वाजता पायी दिंडी सोहळ्याने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी महिला, पुरुष आबालवृद्ध वारीसाठी भजन गात पंढरपूरकडे निघाले आहेत. जागोजागी दिंडीचे भक्त स्वागत करीत आहेत. वारकरी भजनात तल्लीन होताना दिसत आहेत. टाळ-मृदंगाच्या  भवानीनगर लेझीम पथक धोलवड, आंबी दुमला येथील महिला टाळपथक हे दिंडी सोहळ्यात सहभागी झाले होते तर पायी पालखी आळे, आळकुटी, वडझिरे, पारनेर, पिंपळनेर, ढवळगाव, बेलवंडी, श्रीगोंदा, चांडगाव, जलालपूर, सिद्धटेक, बारडगाव, कोर्टी, वीट, कारखाना, टेंभुर्णी, वरवडे, आष्टी ही मुक्कामाची ठिकाणे असून या मार्गाने पालखी जाणार आहे. 
 
गुरुवार (३ जुलै) रोजी पंढरपूर येथे पोहोचणार आहे. ६५ एकरच्या शेजारी नदी पलीकडे बोराटे मळा हे पालखी सोहळ्याच्या मुक्कामाचे ठिकाण आहे, असे व्यवस्थापक शांताराम वाकर यांनी सांगितले.
 

Related Articles