नवी दिल्ली : देशात गेल्या २४ तासांत १ हजार २१९ कोरोना बाधित रुग्ण बरे झाल्याने, गुरुवारी या विषाणूपासून मुक्त झालेल्या रूग्णांची संख्या १७ हजार १६४ वर पोहोचली. एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५ हजार ९७६ वर आली आहे. या कालावधीत आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ११६ वर पोहोचला आहे. केरळमध्ये सर्वाधिक १ हजार ३०९ सक्रिय रुग्ण आहेत. केरळमध्ये सर्वाधिक ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये १ हजार ४६ आणि पश्चिम बंगालमध्ये ७४७ रुग्ण आढळले आहेत. नवीन प्रकार देशातील ३२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरला आहे.वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने खबरदारी घेण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. मुख्य आरोग्य अधिकार्यांनी सर्व रुग्णालयांना आवश्यक औषधे, पीपीई किट, चाचणी सुविधा, आयसोलेशन बेड, ऑक्सिजन सिलिंडर, आयसीयू आणि व्हेंटिलेटर तयार ठेवण्यास सांगितले आहे.
Fans
Followers