E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
वैष्णवी प्रकरण मानवतेला काळिमा फासणारे...
Wrutuja pandharpure
23 May 2025
सखोल चौकशीचे आदेश
मुंबई
, (प्रतिनिधी) : वैष्णवी हगवणे प्रकरणी मी स्वत: पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांना हस्तक्षेप करण्यास सांगितले आहे. वैष्णवीचे बाळ आता तिच्या वडिलांकडे पोहोचलेले आहे. ही माणुसकीला काळिमा फासणारी घटना आहे. या प्रकरणाची योग्यरीतीने चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले.
वैष्णवी प्रकरण दुर्देवी असून मानवतेला काळिमा फासणारी घटना असल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वैष्णवीचे बाळ स्वत:कडेच ठेवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. मात्र, मी स्वत: पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांना यात हस्तक्षेप करण्यास सांगितले. आता हे बाळ वैष्णवीच्या वडिलांच्या घरी पोहोचविण्यात आले आहे. वैष्णवीच्या अंगावर ज्या प्रकारे मारहाणीचे वळ होते, तिच्या ऑडिओ क्लिप्स तसेच वैष्णवीच्या घरच्यांनी दिलेली माहिती या आधारावर चौकशी करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
माझा काय संबंध?
दोषी असेल तर खुशाल फासावर लटकवा
बारामती, (प्रतिनिधी) : आम्ही राजकीय जीवनात वावरणारे आहोत. प्रेमापोटी अनेकजण लग्नाला बोलवितात. शक्य तेवढ्या कार्यक्रमांना मी जाण्याचा प्रयत्न करतो. पण, नंतर कोणी सुनेला त्रास देत असेल तर त्यात अजित पवारचा काय दोष? मी त्यांना असे करायला सांगतो का? अशा प्रकरणात माझा काय संबंध? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणावर बोलताना केला. या प्रकरणात मी दोषी असेल तर, खुशाल मला फासावर लटकवा, असेही ते म्हणाले.
माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने बारामतीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यावेळी पवार बोलत होते.
वैष्णवी यांचे सासरे राजेंद्र हगवणे हे अजित पवार यांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत. वैष्णवी यांच्या लग्नाला अजित पवार उपस्थित होते. त्यावरुन सुरू असलेल्या चर्चांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, राजेंद्र हगवणे याच्यावर कठोर कारवाई करत, त्याची पक्षातून हकालपट्टी केली आहे. हगवणे यांच्यासारखी माणसे माझ्या पक्षात नको. ही घटना मला समजताच मी स्वतः पिंपरी-चिंचवड पोलिसांना दूरध्वनी करून या प्रकरणात दोषी कोणीही असू द्या, त्यावर कठोर कारवाई करा, अशा सूचना केल्या होत्या.
वैष्णवीची सासू, नवरा, नणंद सध्या कारागृहात आहे. सासरा पळून-पळून कुठे जाणार आहे? तीन नव्हे तर सहा पथके शोध कार्याला लावा; पण त्याच्या मुसक्या आवळा, असे मी पोलिसांना सांगितले आहे. मी नेहमी महिला आणि भगिनींसाठी अनेक योजना आणल्या. मात्र, काही वृत्तवाहिन्या माझा काहीही संबंध नसताना माझी बदनामी का करत आहेत? असा सवालही त्यांनी केला.
पवार पुढे म्हणाले, वैष्णवी यांच्या लग्नाला मी गेलो होतो. तेव्हा मोटारीची चावी माझ्या हातून देण्यात आली होती. तेव्हा मी चावी देताना विचारले की, मोटार स्वखुशीने देत आहात की बळजबरीने? जर बळजबरीने असेल तर एकेकाकडे बघतो, असे मी म्हणालो होतो. मी एवढा कडक वागतो तरी देखील माझी बदनामी केली जात आहे. राजेंद्र हगवणे माझ्या पक्षाचे असले तरी, त्यांची आज मी पक्षातून हकालपट्टी करत आहे. असली माणसे माझ्या पक्षात नको आहेत, असेही पवार म्हणाले.
Related
Articles
खरी शिवसेना कोणती ते शिंदे यांनी दाखवून दिले : शहा
21 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
भांबवली-वजराई धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
18 Jun 2025
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी नवे स्थानक उद्यापासून सेवेत
20 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
खरी शिवसेना कोणती ते शिंदे यांनी दाखवून दिले : शहा
21 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
भांबवली-वजराई धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
18 Jun 2025
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी नवे स्थानक उद्यापासून सेवेत
20 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
खरी शिवसेना कोणती ते शिंदे यांनी दाखवून दिले : शहा
21 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
भांबवली-वजराई धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
18 Jun 2025
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी नवे स्थानक उद्यापासून सेवेत
20 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
खरी शिवसेना कोणती ते शिंदे यांनी दाखवून दिले : शहा
21 Jun 2025
सायबर चोरट्यांकडून सात लाखांची फसवणूक
17 Jun 2025
भांबवली-वजराई धबधब्यावर पर्यटकांची गर्दी
18 Jun 2025
पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी नवे स्थानक उद्यापासून सेवेत
20 Jun 2025
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
16 Jun 2025
सिंहगडावर पालखी सोहळा उत्साहात
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला
3
बच्चू कडू यांचे आंदोलन स्थगित
4
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
5
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
6
केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले