E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
अहमदनगर, मुंबई उपनगर पश्चिम,पुणे शहर संघांचे विजय
Vikrant kulkarni
16 Jun 2025
पुणे : म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्री़डा संकुल येथे सुरू असलेल्या १ ली युवा महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या दुसर्या दिवशी सायंकाळच्या सत्रात मुलांच्या जळगाव आणि बीड यांच्यात झालेला सामना ४२-४२ असा निर्धारित वेळेत बरोबरीत झाला. यामुळे दोन्ही संघाना १-१ साखळी गुण मिळाले. मध्यंतराला बीड संघ २३-१८ असा आघाडीवर होता. मद्यतंरानंतर जळगाव संघाने बीडच्या संघाला बरोबरीत रोखले. बीडच्या सोहम भागे व जयेश सपकाळे यांनी सुरेख खेळ केला. जळगावच्या जावेद खाटीक व निखिल वांद्रे यांनी जोरदार खेळ करीत आपल्या संघाला बरोबरीत नेले. पुणे शहर संघाने सोलापूर संघावर ६३-३२ असा विजय मिळवित आपल्या गटातील पहिला विजय मिळविला. मध्यंतराला पुणे शहर संघाकडे ३२-२३ अशी आघाडी होती. पुणे शहर संघाच्या रोहन बिले, आयुष पांडे, वेदांत चव्हाण, याशीर सुतार यांनी आक्रमक खेळ केला. सोलापूरच्या संग्रामसिंग सारक व सक्षम गायकवाड यांनी काहीसा प्रतिकार केला.
सकाळच्या सत्रात झालेले दोन्ही विभागातील सामने एकतर्फी झाले. मुंबई उपनगर पश्रि्चमने ग गटात लातूरला ६३-३० असे पराभूत करीत साखळीत पहिला विजय नोंदविला. आक्रमक सुरुवात करीत पूर्वार्धात ३ लोण देत ३५-१५ अशी भक्कम आघाडी घेतली. उत्तरार्धात तोच जोश कायम राखत गुणांचे अर्धशतक पार केले. सुरज यादव, विजयनाथ पाल यांच्या चढाई पकडीच्या झंझावाती खेळामुळे हा मोठा विजय शक्य झाला. लातूरचा संतोष घवले बरा खेळला. उपनगर पहिला विजय नोंदवित असताना मुंबई शहराला मात्र पराभवाचा झटका बसला.
नंदुरबारने ह गटात मुंबई शहर पश्मिचा ६४-१८ असा सहज पाडाव केला. पहिल्या सत्रात दोन लोण देत ३०-अशी आघाडी घेतली. दुसर्या सत्रात आणखी ३ लोण देत ४६ गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला. मुंबईशहर पश्चिमचा श्रेयस पुल्लरी बरा खेळला. ब गटात पिंपरी चिंचवडेने रायगडला ४५-३० असे, तर इ गटात ठाणे ग्रामीणने नाशिक ग्रामीणला ५९-२७ असे पराभूत करीत आगेकूच केली.
मुलींच्या इ गटात पुणे ग्रामीणने पालघरला ३४-२१ असे पराभूत केले. पहिल्या डावात १२-०९ अशी आघाडी घेणार्या पुण्याला दुसर्या डावात पालघरने कडवी लढत दिली. शेवटी पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पुण्याने बाजी मारली. पुण्याकडून सई शिंदे, वर्षा बनसोडे, तनिषा यांच्या संयमी खेळाला जाते. पालघरच्या मनाली चव्हाण, पायल बेळकर यांचा खेळ संघाचा पराभव टाळण्यासाठी थोडा कमी पडला.
नंदुरबारने ब गटात बीडला ३२-२३ असे नमविले. ज्योतिर्मय शिंदे, संगीता पाटील, वैष्णवी साबळे यांच्या जोशपूर्ण सुरुवातीने लोण देत नंदुरबारने २२-०८ अशी आघाडी घेतली होती. पण विश्रांतीनंतर बीडच्या सिमरन शेख, अश्विनी कोठेकर यांनी आपला खेळ उंचावत नंदुरबारला चांगलेच जेरीस आणले. पण वेळेचे गणित न जुळल्याने पराभवाला सामोरी जावे लागले.
पिंपरी चिंचवड संघाच्या संघाने नांदेड संघावर ५८-२४ असा पराभव करीत आगेकुच केली. मध्यंतराला पिंपरी चिंचवड संघाकडे २९-९ अशी आघाडी होती. पिंपरी चिंचवडच्या संतोषी थोरवे, डिंपल उडानदिवे, अंजली पॉल यांनी चांगला खेळ केला. नांदेडच्या श्रेया सुडेवड हिने एकाकी झुंज दिली.
रत्नागिरी संघाने सोलापूर संघाचा ५०- १४ असा पराभव करीत सहज विजय मिळविला. रत्नागिरीच्या सलोनी महाडिक सुध्दा शिर्के व गौरी कांबळे यांनी सुरेख खेळ केला. सायंकाळच्या सत्रात अहमदनगर संघाने धुळे संघावर ५९-१४ अशी मात करीत विजय मिळविला. मद्यंतराला अहमदनगर संघाकडे २७-५ अशी भक्कम आघाडी होती. अहमदनगरच्या ज्ञानेश्वरी ढवन, फौजीया शेख यांनी आक्रमक चढाया केल्या तर श्रेया अडसुळ व वीरा ढोंबरे यांनी पकडी घेतल्या. धुळे संघाच्या साक्षी परमान हिने चांगला खेळ केला. मुंबई उपनगर पश्चिम संघाने ठाणे ग्रामीण संघावर ५२-३२ असा विजय मिळविला. मध्यंतराला मुंबई उपनगर पश्चिम संघाकडे साक्षी गावडे व कुमकुम सिंग यांनी जोरदार हल्ला करीत विजय साकार केला. तर ईश्वरी डोरा हिने पकडी केल्या. ठाणे ग्रामीण संघाच्या संजना विशे व श्रावणी शेलार यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.
Related
Articles
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
04 Jul 2025
कष्टकर्यांनी वाचला मंत्र्यांपुढे समस्यांचा पाढा
28 Jun 2025
लखनौत शस्त्र कारखान्यावर छापा
02 Jul 2025
राजेश कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव
01 Jul 2025
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आर्यवीर कोहली खेळणार?
01 Jul 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
29 Jun 2025
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
04 Jul 2025
कष्टकर्यांनी वाचला मंत्र्यांपुढे समस्यांचा पाढा
28 Jun 2025
लखनौत शस्त्र कारखान्यावर छापा
02 Jul 2025
राजेश कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव
01 Jul 2025
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आर्यवीर कोहली खेळणार?
01 Jul 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
29 Jun 2025
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
04 Jul 2025
कष्टकर्यांनी वाचला मंत्र्यांपुढे समस्यांचा पाढा
28 Jun 2025
लखनौत शस्त्र कारखान्यावर छापा
02 Jul 2025
राजेश कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव
01 Jul 2025
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आर्यवीर कोहली खेळणार?
01 Jul 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
29 Jun 2025
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा
04 Jul 2025
कष्टकर्यांनी वाचला मंत्र्यांपुढे समस्यांचा पाढा
28 Jun 2025
लखनौत शस्त्र कारखान्यावर छापा
02 Jul 2025
राजेश कुमार राज्याचे नवे मुख्य सचिव
01 Jul 2025
दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आर्यवीर कोहली खेळणार?
01 Jul 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी
29 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले
6
मातृभाषा हा ज्ञानमार्गाचा पाया