पुणे : सायबर चोरटयांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या (आरटीओ) नावाने एपीके फाईलद्वारे बनावट ट्रॅफिक चलन पाठवून एका महिलेची सात लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जांभूळवाडी रस्ता परिसरातील एका ३३ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. सायबर चोरटयांनी २१ मे रोजी त्यांच्या मोबाईलवर ’आरटीओ ट्रॅफिक चलन-५००’नावाची एपीके फाईल पाठवली. यामध्ये वाहतूक नियमभंगाचे चलन असल्याचे भासविण्यात आले. चलन असल्याचे समजून महिलेने फाईल उघडताच तिचा मोबाईल हॅक झाला. मोबाईल हॅक होताच चोरटयांनी महिलेचे सोशल मिडीया अकाऊंट निष्क्रीय करून तिच्या बँक खात्याशी संबंधीत सर्व गोपनीय माहिती मिळवली. मिळालेल्या माहितीचा गैरवापर करून त्यांनी सात लाख रूपये स्वत:च्या खात्यात ट्रान्स्फर करून घेतले.
Fans
Followers