बेकायदा बाल संस्था सुरु असल्यास महिला व बालविकास विभागाला कळविण्याचे आवाहन   

पुणे : नागरिकांनी आपल्या परिसरात अनधिकृत बाल संस्था सुरु असल्यास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी किंवा चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०९८ तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याशी क्रमांक ०२०-२६१३६८७१, ई मेल jimba@yahoo.com  वर संपर्क साधावा, असे आवाहन महिला व बालविकास अधिकारी मनिषा बिरारीस यांनी केले आहे.
 
पुणे जिल्ह्यातील आळंदी आणि ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशीर बालगृह, वसतीगृह आणि अनाथाश्रम चालविले जात असल्याचे प्रकार समोर आले आहे. या संस्थामध्ये बालकांना डांबून ठेवले जात असून त्याचे शारीरिक, मानसिक व लैंगिक शोषण होत असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबींचा विचार करता बालकांवरील अपराधांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे.
 
याबाबी तरतुदीच्या उल्लघंन करणार्‍या आहेत. या कायद्यानुसार मान्यता प्राप्त नोंदणी प्रमाणपत्र नसलेल्या संस्था चालविणार्‍या व्यक्तीस एक वर्षाचा कारावास आणि एक लाख रुपये किंवा त्याहुन अधिक दंडाची तरतूद आहे, असे बिरारीस यांनी कळविले आहे.

Related Articles