अभिनंदन यांना पकडणारा मेजर ठार   

इस्लामाबाद : भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना पकडणारा पाकिस्तानचा विशेष लष्करी अधिकारी मेजर सईद मोईज अब्बास शाह (वय ३७) हा तालिबान दहशतवाद्यांबरोबर उडालेल्या चकमकीत नुकताच ठार झाला आहे. २०१९ मध्ये वर्धमान उडवत असलेल्या विमानासोबत पाकिस्तानच्या विमानाची डॉगफाइट झाली होती. तेव्हा वर्धमान यांचे विमान कोसळले होते. तेव्हा त्यांना मेजर शाह याने पकडल्याचा दावा केला होता. दरम्यान, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवरील दक्षिण वझिरीस्तान प्रांतातील सरगोदा येथे तालिबानी दहशतवादी आणि पाकिस्तानी सैनिक यांच्यात गेल्या मंगळवारी चकमक उडाली. त्यात मेजर शाह मारला गेल्याचे सांगण्यात आले. 

Related Articles