सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप   

सोलापूर : सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सपाटे यांनी सोलापूर शहरातील लकी चौक पसिरातील स्वतःच्या मालकीच्या शिवपार्वती लॉजमध्ये पुण्यातील पिडीत महिलेला दोन वेळा बोलावून विनयभंग केल्याची तक्रार दाखल केली आहे. या फिर्यादीनुसार सपाटे यांनी भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क करुन शारिरीक संबंध ठेवण्याची मागणी केली, त्यासाठी धमकावले. सपाटे यांच्या विरुद्ध दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यामुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
 
पिडीत महिला उत्तर सोलापूर तालुक्यातील एका गावची मूळ रहिवासी आहे. सध्या तीचे वास्तव्य पुण्यात आहे . शेतजमिनीच्या न्यायालयीन खटल्यांसाठी ती अधून-मधून सोलापूरला येते. सोलापुरात आल्यानंतर ती आवश्यकतेनुसार लॉजमध्ये राहात असते. मनोहर सपाटे यांच्या लॉजमधील १७ जून रोजी २४ जून रोजी अश्लील भाषेत बोलत आणि स्पर्श करत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 
 
सपाटे यांनी हे कृत्य करताना पीडितेला धमकावले. सपाटे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षातील मोठे नेते आहेत. त्यांचे वय लक्षात घेऊन तसेच त्यांच्या राजकीय पार्श्वभूमीमुळे लगेच फिर्याद दिली नसल्याचे या पिडीतेने म्हटले. तक्रारीवरुन फौजदार चावडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता ७४, ७५ आणि ७८ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या पूर्वी देखील माजी महापौर सपाटे यांच्यावर एका मुख्याध्यापक पिडीतेने केलेला विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे.

सपाटे यांनी सर्व आरोप फेटाळले 

''आपणास काही लोक व कुटुंबातील सदस्यांकडून जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचे मनोहर सपाटे यांनी म्हटले. 'स्टिंग ऑपरेशन'द्वारे केलेल्या व्हिडीओ चित्रीकरणात सर्व गोष्टी समोर आल्या आहेत. 
 
सपाटे यांच्यावर यापूर्वी त्यांच्याच शिक्षण संस्थेतील एका माजी मुख्याध्यापिकेने विनयभंग केल्याची तक्रार केली होती, त्याचा तपास सुरू असतानाच सपाटे यांचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे.  

Related Articles