व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची कपात   

नवी दिल्ली : व्यावसायिक सिलिंडरच्या दरात सुमारे ६० रुपयांची कपात करण्यात आली आहे. नवे दर मंगळवारपासून लागू झाले आहेत. या निर्णयामुळे हॉटेल, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि इतर व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पण, घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.राजधानी दिल्लीत १९ किलोचा व्यावसायिक सिलिंडर १७२३.५० रुपयांऐवजी १६६५ रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये हाच सिलिंडर १७६९ रुपयांना मिळणार आहे.
 
मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत ५८.५० रुपयांनी कमी झाली असून आता १६१६ रुपयांना व्यावसायिक सिलिंडर मिळणार आहे. चेन्नईमध्ये व्यावसायिक सिलिंडरसाठी १८२३.५० रुपये द्यावे लागतील.

Related Articles