जुन्या विमानतळाचे डिसेंबरअखेर नूतनीकरण   

पुणे : लोहगाव येथील विमानतळावरील जुन्या विमानतळाच्या नूतनीकरणाचे काम डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. या विमानतळाचे नूतनीकरण झाल्यानंतर प्रवाशांची अधिकची सोय होणार आहे. तसेच नव्या विमानतळाप्रमाणे जुन्या विनातळाचे रूपही बदलणार आहे. तसेच विमानतळाचे क्षेत्रही वाढणार आहे. 
 
विनातळावरील जुन्या विमानतळाचे नूतनीकरण आणि जुन्या व नवीन विमानतळाच्या अंतर्गत जोडणीच्या कामामुळे पुणे विमानतळाचे क्षेत्र वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा हवाई प्रवास सुखकर होणार आहे. त्यात १४ नवीन चेक-इन काऊंटर्सची भर पडणार आहे. त्यामुळे विमानतळात प्रवेश करण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. प्रवाशांना तात्काळ विमानतळामध्ये प्रवेश करता येणार आहे. या प्रक्रियेमुळे विमानतळावर अधिक सुलभता येणार आहे. जुन्या विमानतळाचे नूतनीकरण सुरक्षा मानकांनुसार केले जात आहे. अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली. 
 
नूतनीकरणामुळे दोन्ही विमानतळ जोडले जाणार असल्यामुळे प्रवाशांना एका विनातळावरून दुसर्‍या विनातळावर जाता येणार आहे. एकात्मिक व्यवस्थापनामुळे विमानतळाच्या एकूण कामकाजात आणि प्रवाशांच्या हालचालींमध्ये अधिक कार्यक्षमता येणार आहे. विमानतळाची जागा अधिक प्रमाणात वापरात येणार असल्याने त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. दोन्ही विमानतळावर चेक-इन, सुरक्षा तपासणी आणि बोर्डिंग गेट्स सेवा अधिक सुव्यवस्थित होईल. प्रवाशांना कमीत कमी प्रतीक्षा करावी लागेल. 
 

Related Articles