रील बनवताना १३व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू!   

बंगळुरू : निर्माणाधीन इमारतीच्या १३ व्या मजल्यावरून पडून एका २० वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. संबंधित तरुणी रात्री उशीरा आपल्या मित्रांसोबत पार्टी करायला गेली होती. त्यानंतर तिथेच तरुणीने रील बनवायला सुरुवात केली. परंतु, अचानक तोल गेल्याने ती लिफ्टच्या खड्यामध्ये पडली. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. 
 
मयत तरुणी बिहारची रहिवासी असून एका शॉपिंग मार्टमध्ये काम करायची. घटनेच्या दिवशी ती आपल्या मित्रांसोबत परिसरातील बांधकामाधीन इमारतीच्या १३ व्या मजल्यावर पार्टी करायला गेली होती. त्यावेळी रील बनवत असताना ती लिफ्टच्या शाफ्टमध्ये पडली आणि तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर तिचे मित्र घटनास्थळावरून पळून गेले. 
 
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत मुलगी मित्रांसोबत पार्टी करण्यासाठी बांधकामाधीन इमारतीच्या १३व्या मजल्यावर गेली असताना तिच्यासोबत अशी दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी परप्पाना अग्रहारा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles