मराठी जनतेच्या रेट्यामुळे सरकार नमले : राज   

मुंबई, (प्रतिनिधी) : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, हिंदीची सक्ती फक्त आणि फक्त मराठी भाषकांच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली, असे नमूद करुन हा मराठी माणसाचा विजय असल्याचे सांगितले. हा निर्णय कायमचा रद्द झाला आहे, असे आम्ही गृहीत धरतो आणि महाराष्ट्रातील नागरिकांनी पण हेच गृहीत धरले आहे. त्यामुळे पुन्हा समितीच्या अहवालाचा घोळ घालू नका, अन्यथा या समितीला महाराष्ट्रात काम करू दिले जाणार नाही याची नोंद सरकारने घ्यावी, असा इशाराही राज यांनी दिला आहे.
 
हिंदीबाबतचे आदेश रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केल्यानंतर, राज ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत भूमिका जाहीर केली आहे.  हिंदीसाठी सरकार इतका अट्टाहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता, हे मात्र अजून गूढच आहे. पण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांनी हिंदी शिकावीच म्हणून तीन भाषा लादण्याचा जो प्रयत्न होता तो एकदाचा हाणून पाडला गेला आणि यासाठी महाराष्ट्रातील तमाम जनतेचे अभिनंदन. 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एप्रिल २०२५ पासून या विषयावर आवाज उठवला होता आणि तेंव्हापासून हा मुद्दा तापायला लागला. त्यानंतर एक एक राजकीय पक्ष आवाज उठवायला लागले, असे राज यांनी या पोस्टमध्ये  म्हटले आहे. 
 

Related Articles