फिरकीपटू केशव महाराजचा अनोखा विक्रम   

बुलावायो : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ठरलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ सध्या झिम्बाब्वेविरूद्ध कसोटी सामना खेळत आहे. या सामन्यात केशव महाराज संघाचे नेतृत्त्व करत आहे. तेंबा बावुमाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात दुखापत झाली होती, त्यामुळे झिम्बाब्वे दौर्‍यासाठी संघाची जबाबदारी केशव महाराजला देण्यात आली. केशव महाराजने संघाचे नेतृत्व करताना अशी कामगिरी केली आहे, जी दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी इतिहासात यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नाही.
 
दक्षिण आफ्रिकेने दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 418 धावा करत डाव घोषित केला. तर झिम्बाब्वे दुसर्‍या डावात 251 धावांवर सर्वबाद झाला. ज्यामध्ये कर्णधार केशव महाराजने 3 विकेट्स घेतले. महाराजने 2 विकेट्स घेत एक अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. 
 
केशव महाराज हा दक्षिण आफ्रिकेकडून कसोटीत 200 विकेट्स घेणारा पहिला फिरकीपटू ठरला आहे. त्याने झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एर्विनला बाद करून ही कामगिरी केली. 35 वर्षीय केशव महाराज गेल्या नऊ वर्षांपासून कसोटी क्रिकेट खेळत आहे आणि या फॉरमॅटमध्ये आघाडीचा फिरकी गोलंदाज म्हणून त्याने आपले नाव कमावले आहे. तो याआधीच दक्षिण आफ्रिकेचा कसोटीत सर्वात यशस्वी गोलंदाज बनला आहे. केशव ह्यू टायफिल्डचा 170 विकेट्सचा विक्रम मागे टाकत अव्वल स्थानावर पोहोचला.
 
केशव महाराजच्या गोलंदाजीवर जेव्हा इर्विनला काइल वेरेनने यष्टीचीत केले तेव्हा 200 कसोटी विकेट्स सह त्याने एक नवा विक्रम केला. या डावखुर्‍या फिरकी गोलंदाजाच्या नावावर आता 59 कसोटी सामन्यात 202 विकेट आहेत. त्याने 11 वेळा एका डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे आणि एकदा सामन्यात 10 विकेट्सही घेतले आहेत.
 
दक्षिण आफ्रिकेसाठी 200 पेक्षा जास्त कसोटी विकेट्स घेणारा महाराज हा नववा दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज आहे. डेल स्टेन हा या संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने 93 कसोटी सामन्यांमध्ये 439 विकेट्स घेतल्या आहेत. फिरकी गोलंदाजांमध्ये महाराज आणि टेफिल्डनंतर पॉल अ‍ॅडम्सचे नाव येते ज्याने 134 विकेट्स घेतल्या. पॉल हॅरिस (103) आणि निकी बोए (100) हे दक्षिण आफ्रिकेचे इतर फिरकीपटू आहेत ज्यांनी कसोटी सामन्यात किमान 100 विकेट घेतले आहेत.
 
रंगना हेरथ (श्रीलंका)- 433
डॅनियल व्हिटोरी (न्यूझीलंड)- 362
रवींद्र जडेजा (भारत)- 324
डेरेक अंडरवुड (इंग्लंड)- 297
बिशनसिंग बेदी (भारत)- 266
शकीब अल हसन (बांगलादेश)- 246
तैजुल इस्लाम (बांगलादेश)- 237
केशव महाराज (दक्षिण आफ्रिका)- 200

Related Articles