पंख तुमचे, पण आकाश कोणाचेही नाही...   

शशी थरुर यांची खर्गे यांच्यावर टीका 

नवी दिल्ली : काही जणांसाठी पंतप्रधान मोदी आधी येतात आणि नंतर देश येतो, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी खासदार शशी थरुर यांच्यावर केली होती. या टीकेचा समाचार थरूर यांनी घेतला असून प्रत्युत्तरात त्यांनी एक पोस्ट आणि पक्ष्याचे एक छायाचित्र टाकले आहे. त्यावर लिहिले आहे की, उडण्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही. पंख तुमचे आहेत, पण आकाश कोणाचेही नाही, असे त्यात नमूद केले आहे.
 
दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर परदेशात सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ पाठवण्यात आले होते. तेव्हा काँग्रेसने खासदारांच्या यादीत शशी थरुर यांचा समावेश केला नव्हता. तरीही शिष्टमंडळात केंद्र सरकारने थरुर यांची निवड केल्यानंतर काँग्रेसचे नेते संतापले होते. पंतप्रधान मोदींचे कौतुक थरुर यांनी केल्यानंतर ते अधिकच भडकले होेते. अनेक काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर टीका देखील केली होती. दरम्यान, अनेक प्रसंगी, थरूर यांचे मत पक्षाच्या विचारसरणीपेक्षा वेगळे राहिले आहे.. यानंतर खर्गे यांनी थरुर यांच्यावर टीका करताना काही जणांच्या दृष्टीने मोदी आधी येतात आणि मग देश येतो, अशी टीका केली. प्रत्त्युतरात थरूर म्हणाले की जेव्हा एखादी व्यक्ती जागतिक मंचावर असते तेव्हा ती पक्ष आणि इतर सीमांच्या पलीकडे जाते. माझ्यासाठी देश आधी येतो आणि पक्ष नंतर येतो. या संदर्भात द हिंदू वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखानंतर काँग्रेस पक्षश्रेष्ठ त्यांच्यावर अधिकच नाराज झाले होते.
 

Related Articles