नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी चार दिवसांच्या दौर्यासाठी सोमवारी भूतानकडे रवाना झाले. भारत आणि चीनचे सैन्य काही वर्षांपूर्वी डोकलाम येथे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्या पार्श्वभूमीवर डोकलाम येथील सुरक्षा व पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी ते रवाना झाल्याचे मानले जात आहे. भूतानची राजधानी थिंपू येथे राजे जिग्मे खैसर न्यामगाल वांगचूक आणि भुतानचे लष्करप्रमुख जनरल बटू त्शेरिंग यांच्याशी चर्चा करणार आहेत. भारताने काही आठवड्यांपूर्वी ऑॅपरेेशन सिंदूर मोहीम पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात राबविली होती. यानंतर प्रादेशिक सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी द्विवेदी यांचा दौरा ३ जुलैपर्यंत आयोजित केला आहे.
Fans
Followers