काँग्रेसशी कोणताही संबंध नाही   

बिहारमध्ये ‘आप’ स्वबळावर

नवी दिल्ली : ‘इंडिया’ आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठी होती. आम आदमी पक्षाचा आता काँग्रेसशी कोणताही संबंध नाही, असे स्पष्ट करताना ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल यांनी गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने सत्ताधारी भाजपला मदत केल्याचा आरोप केला. बिहारमध्ये ‘आप’ स्वबळावर लढणार असल्याचेही ते म्हणाले.
 
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आम आदमी पक्ष २०२७ ची विधानसभा निवडणूक लढवेल आणि विजयी होईल. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसला ‘आप’ हा दुसरा पर्याय आहे. आमची काँग्रेसशी कोणतीही आघाडी नाही. जर आघाडी असती तर त्यांनी विसावदरमधील पोटनिवडणूक का लढवली? असा सवाल करतानाच ते आम्हाला पराभूत करण्यासाठी आले होते, असेही ते म्हणाले. ‘इंडिया’ आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीसाठी होती. आता काँग्रेससोबत ‘आप’ची कोणतीही आघाडी नाही, असेही केजरीवाल म्हणाले. ’आप’ नेते गोपाल इटालिया यांनी नुकताच जुनागड जिल्ह्यातील विसावदर मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपचे किरीट पटेल यांचा १७ हजार मतांनी पराभव केला. काँग्रेसचे उमेदवार नितीन रणपरिया यांना ५,५०१ मते मिळाली होती.
 

Related Articles