E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शिवसेनेचे हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन
Wrutuja pandharpure
30 Jun 2025
हडपसर
: मुंढवा क्षेत्रीय कार्यालयातील प्रशासनाचा बेजबाबदार, बेशिस्त व अकार्यक्षम कारभार गेल्या अनेक महिन्यांपासून नागरिकांच्या तक्रारींचे कारण ठरत आहे. याच्या निषेधार्थ आज शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.हडपसर परिसरातील शेकडो संतप्त नागरिकांच्या उपस्थितीत हे आंदोलन शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.
प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते.सत्ताधारी पक्षातील प्रमुख स्थान असलेल्या शिवसेनेनेच या गैरकारभाराच्या विरोधात उघडपणे आवाज उठवल्याने या आंदोलनाला विशेष राजकीय व सामाजिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
नागरिकांना मूलभूत सेवा वेळेवर न मिळणे,पिण्याच्या पाण्यात दूषित पाण्याचा पुरवठा,रस्त्यांवर बेकायदेशीर अतिक्रमणाचे साम्राज्य,क्षेत्रीय कार्यालयातील हजेरी प्रणालीतील अनियमितता, बायोमेट्रिक यंत्रणा गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद,अधिकारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नाहीत,नागरी समस्या सोडविण्यात प्रशासनाची टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत या सर्व मुद्द्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करत, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व अंगीकृत संघटनांनी एकत्र येत आंदोलन केले. आंदोलनादरम्यान नागरिकांनी देखील आपले अनुभव आणि त्रास माध्यमांसमोर व्यक्त करत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा खरपूस समाचार घेतला.
शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की, “हडपसर परिसरातील नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून प्रशासनाच्या अकार्यक्षमतेचा त्रास सहन करत आहेत. आम्ही वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे आजचा संताप ओघातच होता. पिण्याच्या पाण्यातील दूषितता, रस्त्यांवरील अतिक्रमण, आणि अधिकारी वर्गाची बेजबाबदारी यामुळे संपूर्ण यंत्रणा ढिम्म झाली आहे. जर येत्या ८ दिवसांत प्रशासनाने सुस्थितीत कामकाज सुरू केलं नाही, तर शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन अधिक उग्र करेल व प्रशासनाला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही,” असा ठाम इशारा भानगिरे यांनी दिला.
हडपसर-मुंढवा परिसरातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण न होणे ही गंभीर बाब आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाची चाचपणी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत प्रशासनाकडून ठोस पावले उचलली गेली नाही तर अजून तीव्र स्वरूपाचे आंदोलन शिवसेना पुकारेल असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास भाऊ तुपे, उपजिल्हाप्रमुख अमर घुले व शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related
Articles
विद्यार्थ्यांनी लोकमान्यांचे विचार आत्मसात करावे
24 Jul 2025
तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ
21 Jul 2025
टिमवित ‘लोकमान्य वेब रेडिओ’ नव्या केंद्राचे उद्घाटन
24 Jul 2025
अखेर बिबट्या पिंजर्यात
23 Jul 2025
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक आरटीओच्या रडारवर
21 Jul 2025
मुख्याधिकारी रात्री अचानक पाहणी दौर्यावर
25 Jul 2025
विद्यार्थ्यांनी लोकमान्यांचे विचार आत्मसात करावे
24 Jul 2025
तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ
21 Jul 2025
टिमवित ‘लोकमान्य वेब रेडिओ’ नव्या केंद्राचे उद्घाटन
24 Jul 2025
अखेर बिबट्या पिंजर्यात
23 Jul 2025
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक आरटीओच्या रडारवर
21 Jul 2025
मुख्याधिकारी रात्री अचानक पाहणी दौर्यावर
25 Jul 2025
विद्यार्थ्यांनी लोकमान्यांचे विचार आत्मसात करावे
24 Jul 2025
तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ
21 Jul 2025
टिमवित ‘लोकमान्य वेब रेडिओ’ नव्या केंद्राचे उद्घाटन
24 Jul 2025
अखेर बिबट्या पिंजर्यात
23 Jul 2025
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक आरटीओच्या रडारवर
21 Jul 2025
मुख्याधिकारी रात्री अचानक पाहणी दौर्यावर
25 Jul 2025
विद्यार्थ्यांनी लोकमान्यांचे विचार आत्मसात करावे
24 Jul 2025
तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ
21 Jul 2025
टिमवित ‘लोकमान्य वेब रेडिओ’ नव्या केंद्राचे उद्घाटन
24 Jul 2025
अखेर बिबट्या पिंजर्यात
23 Jul 2025
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक आरटीओच्या रडारवर
21 Jul 2025
मुख्याधिकारी रात्री अचानक पाहणी दौर्यावर
25 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
बाजारात खोबर्याचा तुटवडा
5
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
6
टीआरएफ आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना