अमरनाथ यात्रा कडेकोट सुरक्षेत   

चार जुलैपासून दोन मार्गांनी सुरू 

श्रीनगर : देश आणि परदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील अमरनाथ यात्रेला पुढील महिन्यात ४ जुलै रोजी प्रारंभ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर यात्रेसाठी कडेकोट सुरक्षा पुरविली जाणार आहे, अशी माहिती पोलिस अधिकारी व्ही. के. बरडी यांनी बुधवारी दिली. 
 
अमरनाथ गुहेत बर्फाचे शिवलिंग तयार होते. ते शिव आणि पार्वतीचे निवासस्थान मानले जाते. उंचीवर पर्वतात असलेल्या गुहेत कबुतराची एक जोडी निरंतर वास करते. गेल्या अनेक शतकांपासून अमरनाथ गुहेतील बर्फाच्या  शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी देश आणि परदेशातील भाविक मोठ्या संख्येने येतात. जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या सुरक्षेत यात्रा सुरू होत आहे. 
 
गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही यात्रेला बहुस्तरीय सुरक्षा देण्यात येत आहे. त्यामुळे यात्रा सुखरूप पार पडण्यास मदत मिळणार असल्याची माहिती अनंतनाग येथे पोलिस महासंचालक यांनी दिली. 
 
दरम्यान, बिरडी यांनी काल पहलगाम मार्गावरील नुवान येथील भाविकांच्या शिबिर स्थळाला भेट दिली. येथून भाविकांची तुकडी ३ जुलैला रवाना होत आहे. यात्रा एकूण ३८ दिवसांची असून ती दोन मार्गे सुरू राहणार आहे. त्यासाठी पोलिसांनी रंगीत तालीम केली. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम, अनंतनाग आणि क्वाझीगुंड येथे आणि उत्तर काश्मीरमधील बंडीपुरा जिल्ह्यातदेखील रंगीत तालीम केली.
 

Related Articles