अहमदाबाद : एअर इंडियाच्या विमान दुर्घटनेतील विमानाचे अवशेष हटविण्याचे काम येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरात सुरू आहे. अहमदाबाद ते लंडन प्रवास करणारे एअर इंडियाचे ड्रीमलायनर विमान १२ जून रोजी दुपारी कोसळले होते. त्यात विमानातील २४१ जणांचा मृत्यू तर, वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांच्या वसतिगृहातील २९ अशा २७० जणांचा मृत्यू झाला होता. या विमानाच्या शेपटीचा भाग वसतिगृहाच्या इमारतीवर अडकून पडला होता. तो काढण्याचे काम सुरू आहे. ते कालही सुरू होते. विमान कोसळल्यानंतर आग लागून अनेक जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
Fans
Followers