जागतिक तपमानवाढीमुळे ढगांच्या स्वरूपात बदल   

पृथ्वीचा सुमारे दोन तृतीयांश पृष्ठभाग ढगांनी व्यापलेला आहे. हा ढगांनी व्यापलेला भाग पृथ्वीला थंड ठेवतात; पण पृथ्वी जसजशी उष्ण होत जाते, तसतसे, प्रामुख्याने जीवाश्म इंधन जाळण्यामुळे वातावरणात हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत असल्याने, ढगांचे स्वरूप देखील बदलत आहे. यामुळे हरितगृह उत्सर्जनामुळे अडकलेली उष्णता वाढत आहे आणि ढगांचे स्वरूप बदलत आहे. गेल्या काही वर्षांत, जगाचे सरासरी तपमान हवामान शास्त्रज्ञांच्या अपेक्षेपेक्षा खूपच जास्त वाढले आहे. नासा गोडार्ड इन्स्टिट्यूट फॉर स्पेस स्टडीजच्या नेतृत्वाखालील करण्यात आलेल्या एका संशोधनात, ढगांच्या स्वरूपातील बदल तपमान वाढण्यास कारणीभूत आहेत.

ढग आणि हवामान

ढग सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचण्यापूर्वी तो अवकाशात परावर्तित करून पृथ्वीला थंड ठेवण्यास मदत करतात; परंतु सर्व ढग सारखे नसतात. तेजस्वी, पांढरे ढग अधिक सूर्यप्रकाश परावर्तित करतात. विशेषतः जेव्हा ते विषुववृत्ताजवळ असतात, पृथ्वीचे ते भाग ज्यांना सर्वाधिक सूर्यप्रकाश मिळतो. राखाडी आणि विखुरलेले ढग सूर्यप्रकाश कमी परावर्तित करतात, तसेच ध्रुवाजवळील ढग कमी प्रकाशात असतात. गेल्या वर्षी समोर आलेल्या संशोधनात असे दिसून आले, की पृथ्वी हरितगृह परिणामापेक्षा जास्त सूर्यप्रकाश शोषत आहे. यामध्ये ढगांचा समावेश होता; परंतु नेमके कसे ते स्पष्ट नव्हते.

तेजस्वी ढगांचे क्षेत्र आकुंचन पावण्याच्या स्थितीत 

नवीन अभ्यासातून समोर आले आहे, की अत्यंत परावर्तित ढगांनी व्यापलेले क्षेत्र आकुंचन पावत आहेत. त्याच वेळी, विखुरलेले, कमी परावर्तित ढग असलेले क्षेत्र वाढत आहेत. त्याचा परिणाम असा झाला आहे, की सूर्यप्रकाशातील अतिरिक्त ऊर्जा पृथ्वीच्या पृष्ठभागावर पोहोचत आहे. येथे ती शोषली जाते, ज्यामुळे अतिरिक्त तपमानवाढ होत आहे.
 
वातावरणातील वायू प्रदूषणाच्या प्रमाणात बदल यासारख्या गोष्टींमुळे होणार्‍या अत्यंत परावर्तित ढगांच्या गुणधर्मांमधील बदलांच्या परिणामाकडे पाहिले असता, असे आढळून आले आहे, की हे परिणाम प्रदेशातील बदलांच्या परिणामापेक्षा खूपच कमी आहेत.

जागतिक चित्र

पृथ्वीच्या वार्‍याचे नमुने विषुववृत्ताजवळून वाढणार्‍या उबदार हवेमुळे आणि पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे चालतात. स्थानिक हवामान प्रणालीत ज्या ढगांचे स्थान आणि प्रकार ठरवतात या प्रमुख, मोठ्या प्रमाणात असलेल्या वारा प्रणालींवर अवलंबून असतात. ’जागतिक तापमानवाढी’मुळे वातावरणातील प्रमुख अभिसरण पद्धती बदलत आहेत. बहुतेक ढगांची क्रिया या प्रमुख वारा प्रणालींच्या बदलांवर होत आहे. विषुववृत्ताजवळील प्रदेशात, ज्याला इंटरट्रॉपिकल कन्व्हर्जन्स झोन म्हणतात, उच्च परावर्तित ढग कमी होत आहेत आणि ३० ते ४० अंश अक्षांश दरम्यान ’स्टॉर्म ट्रॅक’ नावाचे दोन इतर पट्टे देखील आहेत. थोडक्यात, वाढत्या हरितगृह वायूंमुळे होणारी जागतिक तपमानवाढ पृथ्वीवरील प्रमुख परावर्तित ढगांमध्ये बदल घडवून आणते. यामुळे उच्च परावर्तित ढगांचे क्षेत्र कमी होऊन अतिरिक्त उष्णता वाढत आहे. उष्णतेमुळे वारा पद्धती बदलतात, ज्यामुळे ढगांचे नमुने बदलतात आणि परिणामी अधिक तपमानवाढ होते. यालाच आपण हवामान प्रणालीमध्ये ’सकारात्मक अभिप्राय’ म्हणतो: अधिक उष्णतावाढीमुळे अधिक तपमान वाढ होते.
 

Related Articles