ज्योतिष शास्त्रामध्ये अंधश्रद्धेला थारा नाही : दाते   

पुणे : विज्ञानावर आधारित अभ्यास आणि संशोधन ही केवळ ज्योतिष शास्त्राचीच नव्हे तर काळाची गरज आहे. विज्ञान हे ज्योतिषशास्त्राचे मूळ आहे. त्यामुळे ज्योतिष शास्त्रामध्ये अंधश्रद्धेला वाव नाही, असे मत ज्येष्ठ पंचांग कर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केले.
 
ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र, पुणे यांच्या वतीने चतुर्थ पदवी प्रमाणपत्र वितरण व पुरस्कार सोहळ्याचे भव्य आयोजन पद्मावती येथील विणकर सभागृहात करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ ज्योतिषतज्ञ शुभांगिनी पांगारकर, संस्थेचे अध्यक्ष वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी उपस्थित होते. विद्यावाचस्पती ज्येष्ठ गाणपत्य डॉ. स्वानंद पुंड महाराज यांना शारदा पुरस्कार, अभिनव ज्योतिष मंडळ सोलापूर या संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ पंचांगकर्ते मोहन दाते यांना रत्नमाला पुरस्कार,  योगीराज वेद विज्ञान आश्रम या पाठशाळेचे अध्यक्ष अश्वमेघयाजी चैतन्य नारायण काळे गुरुजी यांना वेद संवर्धन प्रेरणा पुरस्कार, वेदमूर्ती दत्तात्रय मनोहर साधले गुरुजी यांना वेदमार्ग दीपस्तंभ पुरस्कार प्रदान करण्यात आले.
 
पदवी प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात वास्तु विशारद, लोलक विशारद, अंक विशारद आणि वास्तु भूषण अभ्यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. या वर्षीच्या पदवी वितरण सोहळ्यात १२० हून अधिक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गौरवचिन्ह प्रदान करण्यात आले. पुरोहितांचे मंगल मंत्र पठण, सान्वी फुंडकर यांचे सुसंस्कृत नृत्य आणि सन्मान समारंभ पार पडला.मोहन दाते म्हणाले, ज्योतिष शास्त्रामध्ये अधिक अभ्यास आणि संशोधन केले पाहिजे. संस्कृती जपण्यासाठी विज्ञानावर आधारित ज्योतिष शास्त्र पुढील पिढीपर्यंत जाणे गरजेचे आहे  देश विदेशातील जवळपास १७५ विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Related Articles