११ वर्षांपासून सुरु असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?   

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांचा सवाल

मुंबई,(प्रतिनिधी) : गेल्या ११ वर्षांपासून देशात सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बुधवारी  केला.सपकाळ म्हणाले, देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिरा गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी झालेल्या काही घटनांवर इंदिरा गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी प्रशासनाकडून काही चुका  झाल्याचे मान्य केले. पण भाजप आणीबाणीवर फक्त कांगावा करत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक  संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी आणीबाणीचे समर्थन केले होते. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाशी संघाचा  संबंध नाही,  असेही जाहीर केले होते. त्यामुळे भाजपला बाळासाहेब देवरसांची भूमिका मान्य नाही का? राज्य सरकारने काल राजभवनात आणीबाणीत तुरुंगवास झालेल्यांचा सत्कार केला. त्यावर सपकाळ यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, भाजपला लोकशाही आणि संविधान संपवून गोळवलकर  यांचे ’बंच ऑफ थॉट’ लागू करायचे आहे.

Related Articles