दुसर्‍या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर   

लंडन : सध्या भारत आणि इंग्लंड संघात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. त्यातील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंड संघाने भारताचा 5 गडी राखून धुव्वा उडवला. आता दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना एजबॅस्टन, बर्मिंगहॅमच्या मैदानावर खेळला जाणार आहे. त्यासाठी इंग्लंडने आपल्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा केली आहे. 
 
इंग्लंड संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. कर्णधार बेन स्टोक्सने हेडिंग्लेमध्ये विजय मिळवलेल्या 11 खेळाडूंसोबतच एजबॅस्टनच्या मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला संघात समाविष्ट करण्यात आले होते, परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. मालिकेतील दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून खेळला जाणार आहे. भारतीय संघाने आजपर्यंत एजबॅस्टनमध्ये एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. त्यामुळे या सामन्यात इतिहास घडणार का? हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरेल. 
 
इंग्लंडचा संघ : झॅक क्रॉली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (यष्टीरक्षक), क्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर.

Related Articles