E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
कोयना पायथा विद्युतगृहास मंजुरी
Samruddhi Dhayagude
26 Jun 2025
धरणाच्या डाव्या तीरावरून होणार अतिरिक्त वीजनिर्मिती
सातारा, (वार्ताहर) : कोयनाधरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) या जलविद्युत प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देतानाच ८६२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यास बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यासाठी या पायथा विद्युतगहाचे नियोजन करण्यात आले आहे. यातून एकूण ८० मेगावॅट वीजनिर्मिती होणार आहे. सुधारित मान्यतेमुळे प्रकल्पाच्या बांधकामाचे काम हाती घेण्यास परवानगी मिळाली आहे. हा प्रकल्प धरणाच्या पायथ्याशी उभारला जाऊन डाव्या तीरावर वीजनिर्मिती केली जाणार आहे.
कोयना धरणाच्या मूळ नियोजनात पूर्वेकडील सिंचनासाठी ३० टीएमसी, तर कृष्णा खोरे महामंडळांतर्गत समाविष्ट विविध उपसा सिंचन योजनांसाठी अतिरिक्त २० टीएमसी पाणी देताना त्यातून कमाल मागणीच्या कालावधीत अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यात येणार आहे.
धरण पायथ्याची वीजगृहे या कालावधीत रूपांतरित करण्यासाठी कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) या योजनेचे नियोजन केले आहे. मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत या प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. २०२३ मध्ये शासनाने सार्वजनिक खासगी भागीदारीद्वारे उदंचन जलविद्युत प्रकल्प, सौर आणि इतर अपारंपरिक संकरित प्रकल्पांच्या विकासाचे धोरण निश्चित केले होते. त्यानुसार आता हा प्रकल्प कृष्णा खोरे महामंडळ व महानिर्मिती कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. या जलविद्युत प्रकल्पाच्या विकासासाठी आवश्यक एकूण १३३६ कोटी ८८ लाख रुपयांपैकी ८६२ कोटी २९ लाख रुपयांच्या तरतुदीस प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. उर्वरित खर्चाची तरतूद सिंचन योजनांवर टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे टेंभू, कृष्णा कोयना उपसा सिंचन योजना या योजनांसाठी २० टीएमसी पाणी वीज निर्मितीनंतर सोडणार आहे. यात एकूण २७७.८२ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती होणार आहे.
अशी आहे योजना
अतिरिक्त वीजनिर्मिती-साठी निर्णय
८० मेगावॅट वीजनिर्मिती होणार
इतर योजनांना मिळणार २० टीएमसी पाणी
धरणांच्या डाव्या तीरावर वीजनिर्मिती
कृष्णा खोरे, महानिर्मिती सामंजस्य करार
Related
Articles
चेंगराचेंगरीस आरसीबी जबाबदार
02 Jul 2025
शिवसेनेचे हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालयासमोर आंदोलन
30 Jun 2025
स्मृतीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा विजय
30 Jun 2025
जम्मू-काश्मीरमधील तीन हॉटेल्सवर ईडीची कारवाई
29 Jun 2025
राज्यात कमी पटसंख्या असूनही शाळा सुरुच : एकनाथ शिंदे
03 Jul 2025
पाकिस्तानी वाटाड्याला अटक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
3
केरळचा आदर्श
4
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
5
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप
6
विद्यार्थिनीवरील सामूहिक अत्याचाराने कोलकाता हादरले