भारतीय संघाची क्रमवारीत घसरण   

हेडिंग्ले : पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात लीड्समध्ये खेळला गेला. हेडिंग्ले येथील लीड्स कसोटीत भारताविरुद्धच्या रोमांचक विजयामुळे इंग्लंडने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-25 च्या पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. त्याच वेळी, या पहिल्या कसोटीतील पराभवामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे आणि तो थेट चौथ्या स्थानावर घसरला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडने भारताचा 5 विकेट्सने पराभव केला आणि 12 गुण मिळवले. या विजयासह, इंग्लंडचा विजय टक्केवारी  100 वर गेला आहे.
 
दुसरीकडे, ही कसोटी गमावल्याने भारताला खूप नुकसान झाले आहे. पराभवानंतर भारताला कोणतेही गुण मिळाले नाहीत आणि त्याचा पीसीटी आता 0 वर आला आहे. डब्ल्यूटीसीचे हे नवीन चक्र 17 जूनपासून गॉलमध्ये खेळल्या गेलेल्या बांगलादेश विरुद्ध श्रीलंका कसोटीने सुरू झाले. दोन्ही संघांमध्ये खेळलेला हा सामना अनिर्णित राहिला.त्या सामन्यातून दोन्ही संघांना 4-4 गुण मिळाले. यामुळेच सध्या बांगलादेश क्रमवारीत टेबलमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे आणि श्रीलंका तिसर्‍या क्रमांकावर आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर ते चौथ्या क्रमांकावर आहे.

Related Articles