E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
रशियाचा युक्रेनवर ड्रोन, क्षेपणास्त्रांचा मारा
Samruddhi Dhayagude
30 Jun 2025
४७७ ड्रोन हल्ले आणि ६० क्षेपणास्त्रे डागली
कीव : रशियाने युक्रेनवर एका रात्रीत ५३७ हवाई हत्यारांचा मारा करत सर्वात मोठा हल्ला केला असल्याची माहिती युक्रेनच्या हवाई दलाने दिली आहे.या हल्ल्यात ४७७ ड्रोन आणि डिकोय (फसवणारे यंत्र) तसेच ६० क्षेपणास्त्रांचा समावेश होता. त्यापैकी २४९ हत्यारे पाडण्यात यश आले, तर २२६ हत्यारे हरवली, जी कदाचित इलेक्ट्रॉनिक जॅमिंगमुळे निष्क्रिय झाली असावीत.
युक्रेनमध्ये गदारोळ...
युक्रेनच्या हवाई दलाचे प्रमुख प्रवक्ते युरी इह्नात यांनी ‘असोसिऐटेड प्रेस’ ला दिलेल्या माहितीनुसार, रशियाचा आतापर्यंतचा हा सर्वात मोठा हल्ला होता. यामध्ये विविध प्रकारच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा समावेश होता. या हल्ल्याचे उद्दिष्ट युक्रेनच्या विविध भागांवर, अगदी पश्चिम युक्रेनसुद्धा होते. जे प्रत्यक्ष युद्धाच्या रेषेपासून खूप दूर आहे. या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये नव्याने अस्थैर्य पसरले असून, शेजारील देश पोलंड आणि त्यांच्या सहयोगी देशांनी आपले लढाऊ विमान उड्डाणात ठेवले, जेणेकरून हवाई हद्दीची सुरक्षितता कायम राहील, असे पोलंडच्या हवाई दलाने स्पष्ट केले.
हल्ल्यातील हानी
खेरसॉनमध्ये एका ड्रोन हल्ल्यात एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रांतीय गव्हर्नर ऑलेक्झांडर प्रोकुडीने दिली. चेरकासी प्रांतात सहा नागरिक जखमी झाले आहेत, त्यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे, अशी माहिती गव्हर्नर इहोर टाबुरेट्स यांनी दिली.
नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग
या युद्धात दोन्ही देशांनी लांब पल्ल्याचे ड्रोन हल्ले मोठ्या प्रमाणावर वापरले आहेत. या हल्ल्यांमुळे युद्ध एक प्रयोगशाळा बनले आहे, जिथे नव्या तंत्रज्ञानाचे व घातक शस्त्रांची चाचणी केले जात आहे. रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला फक्त युद्धाच्या तीव्रतेचे नाही, तर संभाव्य राजनैतिक अपयशाचेही निदर्शक आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न वाढविण्याची आणि द्विपक्षीय संवादाला नवे दिशा देण्याची ही वेळ आहे.
शांततेच्या चर्चेवर पाणी
हा हल्ला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इस्तंबूलमध्ये शांतता चर्चेसाठी तयारी दर्शवल्यानंतर झाला. मागील चार वर्षे या दोन्ही देशांत युद्ध सुरू आहे. मात्र, कुठल्याही शांतता प्रयत्नांना यश आलेले नाही. इस्तंबूलमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात नुकत्याच झालेल्या दोन बैठका अपयशी ठरल्या आणि कोणताही ठोस निर्णय यामध्ये झाला नाही.
Related
Articles
दिव्या देशमुख विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
25 Jul 2025
कोस्टलवर २३६ सीसीटीव्हीचा वॉच
22 Jul 2025
सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार
24 Jul 2025
शाखा व्यवस्थापकाची बँकेतच गळफास घेऊन आत्महत्या
19 Jul 2025
पुतीन यांना भेटण्यास झेलेन्स्की तयार
23 Jul 2025
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
23 Jul 2025
दिव्या देशमुख विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
25 Jul 2025
कोस्टलवर २३६ सीसीटीव्हीचा वॉच
22 Jul 2025
सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार
24 Jul 2025
शाखा व्यवस्थापकाची बँकेतच गळफास घेऊन आत्महत्या
19 Jul 2025
पुतीन यांना भेटण्यास झेलेन्स्की तयार
23 Jul 2025
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
23 Jul 2025
दिव्या देशमुख विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
25 Jul 2025
कोस्टलवर २३६ सीसीटीव्हीचा वॉच
22 Jul 2025
सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार
24 Jul 2025
शाखा व्यवस्थापकाची बँकेतच गळफास घेऊन आत्महत्या
19 Jul 2025
पुतीन यांना भेटण्यास झेलेन्स्की तयार
23 Jul 2025
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
23 Jul 2025
दिव्या देशमुख विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
25 Jul 2025
कोस्टलवर २३६ सीसीटीव्हीचा वॉच
22 Jul 2025
सिंहगड रस्त्यावरील नागरिकांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होणार
24 Jul 2025
शाखा व्यवस्थापकाची बँकेतच गळफास घेऊन आत्महत्या
19 Jul 2025
पुतीन यांना भेटण्यास झेलेन्स्की तयार
23 Jul 2025
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार
23 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)