सामाजिक सुरक्षा योजनांचा फायदा ९५ कोटी नागरिकांना : मोदी   

नवी दिल्ली : सुमारे ९५ कोटी नागरिक कोणत्या ना कोणत्या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ घेत आहेत, तर २०१५ पर्यंत सरकारी योजना २५ कोटींपेक्षा कमी नागरिकांपर्यंत पोहोचल्या होत्या, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिली.
 
’मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. मोदी म्हणाले, सध्या भारतातील बहुतांश नागरिक कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सामाजिक सुरक्षेचा लाभ घेत आहे. अलिकडेच आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा एक महत्त्वाचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात असे नमूद केले आहे, की भारताच्या ६४ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येला आता निश्चितच कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सामाजिक सुरक्षा लाभ घेत आहे. आज देशातील सुमारे ९५ कोटी नागरिकांना कोणत्या ना कोणत्या सामाजिक सुरक्षा योजनेचा लाभ मिळत आहे, तर २०१५ पर्यंत सरकारी योजना २५ कोटींपेक्षा कमी लोकांपर्यंत त्या पोहोचल्या होत्या, असे त्यांनी सांगितले.

प्रत्येक क्षेत्रात देश परिपूर्णतेच्या दिशेने

हे सामाजिक न्यायाचे एक उत्तम चित्र आहे. या यशामुळे असा विश्वास निर्माण झाला आहे, की येणारा काळ आणखी चांगला असेल; भारत प्रत्येक पावलाने अधिक मजबूत होईल. जागतिक आरोग्य संघटनेने भारताला ’ट्रॅकोमा’ मुक्त घोषित करणे ही एक उल्लेखनीय कामगिरी असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले, आणि या यशासाठी आरोग्य कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. ट्रॅकोमा हा एक संसर्गजन्य जिवाणू आहे. जो अंधत्वाचे एक प्रमुख कारण असल्याचेही ते म्हणाले.  
 
मोदींनी यावेळी विविध धार्मिक तीर्थयात्रेला जाणार्‍या सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. सेवेच्या भावनेने या प्रवाशांना यशस्वी आणि सुरक्षित करण्याच्या कामात गुंतलेल्या नागरिकांचेही मी कौतुक करतो. भारतातील व्यक्ती आणि समुदाय बदलाचे उत्प्रेरक बनत असल्याचे त्यांनी नमूद केले.
 

Related Articles