‘संतांच्या अमरत्वाच्या कल्पनेमुळे भारतच जुनी जिवंत संस्कृती’   

नवी दिल्ली : संत आणि महात्मे यांचे तत्त्वज्ञान आणि अमरत्वाच्या कल्पनेमुळे भारत ही जगातील सर्वात जुनी जिवंत सभ्यता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले.
 
र्जैन धर्मगुरु आचार्य विद्यानंद महाराज यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी काल बोलत होते. सरकारच्या कल्याणकारी योजनांना गती देण्याचे कार्य संत आणि महात्मे यांच्यापासून घेतले आहे. त्यामुळे त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या पासून प्रेरणा घेत सरकार वाटचाल करत असल्याचे मोदी यांनी सांगितले. ते म्हणाले, घरकुल, पाणीपुरवठा किंवा आयोग्य विमा सारख्या योजना राबविताना समाजाचे कल्याण व्हावे, हा उद्दात्त हेतु सरकारचा असतो. 
 
साधू आणि संतांच्या आशीर्वादामुळे ऑपरेशन सिंदूर मोहीम सफल झाली, असे सांगताना मोदी यांनी जो हमे छेडेगा, असे वाक्य उच्चारताच उपस्थितांनी उदंड प्रतिसाद दिला. भारताने जगाला अहिंसा एक शस्त्र असल्याची शिकवण दिली. हजारो वर्षांपासून या परंपरेचे भारत पालन करत आला  असून माझे सरकार नागरिकांना गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करत आहे, असे ते म्हणाले.
 
नऊ सूत्रींचे पालन करण्याचे आवाहन
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाणी वाचवा, आईच्या स्मरणार्थ एक झाड लावा, स्वच्छता पाळा, स्थानिक वस्तू खरेदीचा आग्रह धरा, देशातील विविध भागांना भेटी द्या, नैसर्गिक़ शेतीवर लक्ष केंद्रित करा, आरोग्यपूर्ण जीवनशैली स्वीकारा, खेळ आणि योगाकडे वळा आणि गरिबांना मदत करा, या नऊ सूत्रांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.

Related Articles