द्रविड-जॅक कॅलिसचा विक्रम जो रूट मोडणार?   

लंडन : भारत आणि इंग्लंड दोन्ही देशांमध्ये दुसरा कसोटी सामना 2 जुलैपासून सुरू होणार आहे. हा सामना एजबेस्टनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात इंग्लंडचा जो रूट याच्याकडे एक मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. तो राहुल द्रविड़ आणि जॅक कॅलिस यांना कसोटी क्रिकेटमधील सर्वाधिक धावा करणार्‍या खेळाडूंच्या यादीत मागे टाकू शकतो.
 
जो रूटने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत नाबाद अर्धशतक झळकावले होते आणि एकूण 81 धावा केल्या होत्या. जर तो दुसर्‍या कसोटी सामन्यात 202 धावा करू शकला, तर तो द्रविड़ आणि कॅलिस यांना मागे टाकून यादीत वरच्या स्थानावर येईल.राहुल द्रविड यांनी 1996 ते 2012 दरम्यान 164 कसोटी सामने खेळले आहेत. तसेच 286 डावांत 52.31 च्या सरासरीने 13,288 धावा केल्या आहेत. 
 
सध्या ते कसोटीत सर्वाधिक धावा करणार्‍या खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. जॅक कॅलिसने 1995 ते 2013 या काळात 166 कसोटीत 280 डावांत 55.37 च्या सरासरीने 13, 289 धावा केल्या असून तो तिसर्‍या क्रमांकावर आहे.जो रूट सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 2012 पासून आतापर्यंत 154 कसोटी सामने खेळले असून 281 डावांत 50.92च्या सरासरीने 14,087 धावा केल्या आहेत. या तिघांपेक्षा वर असलेले दोन खेळाडू म्हणजे रिकी पाँटिंग  13,378 धावा आणि सर्वात वर असलेले सचिन तेंडुलकर यांनी 15,921 धावा केल्या आहेत.

Related Articles