आणीबाणीतील अनुभवातून बरेच शिकता आले : मोदी   

नवी दिल्ली : आणीबाणीच्या विरोधातील चळवळीतील अनुभव अतिशय कटू होते. त्यापासून बरेच काही शिकता आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. 
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून १९७५ रोजी देशात आणीबाणी लागू केली होती. ती सुमारे २१ महिने लागू होती. सर्व घटनात्मक अधिकार संपुष्टात आणले गेले होते. त्या घटनेला बुधवारी ५० वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर ब्लूॅक्राफ्टकडून प्रकाशित ’आणीबाणीच्या नोंदी- नेता घडवणारी वर्षे’ या पुस्तकाचे प्रकाशन काल मोदी यांच्या हस्ते झाले. त्यात लोकशाही वाचविण्यासाठी मोदी यांनी आणीबाणीत दिलेल्या लढ्याचे संकलन केले आहे. 
 
मोदी म्हणाले, पुस्तकात आणीबाणीतील घटनांचा मागोवा घेतला आहे. त्या माध्यमातून काळ्या आठवणी ताज्या झाल्या. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ज्यांनी आणीबाणी अनुभवली किंवा ज्या कुटुंबाना या कालखंडात झळ बसली. त्यांनी त्या आठवणी समाज माध्यमांवर मांडाव्यात. त्यामुळे १९७५ ते १९७७ दरम्यानची माना खाली घालणारी माहिती मिळाल्याने तरुणांमध्ये जनजागृती होण्यास चालना मिळेल. ते म्हणाले, आणीबाणीत मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तरुण प्रचारक होतो. तो काळ अतिशय कटू होता.  लोकशाही टिकविण्यासाठी तेव्हा मोठा लढा दिला होता. त्या अनुभवापासून आयुष्यात बरेच काही शिकता आले. ब्लूकार्ट डिजिटल फौंउडेशनने पुस्तक प्रकाशित केल्याचा आनंद व्यक्त करताना ते म्हणाले, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौंडा यांनी देखील आणीबाणीतील त्यांच्यावरील प्रसंगाचे लेखन पुस्तकात केले आहे. 
 

Related Articles