इराणी बनावटीच्या ड्रोनचा रशियाकडून मोठा वापर   

युक्रेनमधील अवशेषावरुन अधिक स्पष्ट

मॉस्को : रशियाकडून इराणी बनावटीच्या ड्रोनचा युक्रेन युद्धात वापर केल्याचे उघड झाले आहे. काही ड्रोनचे अवशेष युक्रेन हद्दीत सापडले होते. त्यामुळे ही बाब आता प्रकर्षाने स्पष्ट होत आहे. 
 
गेल्या आठवड्यात ड्रोनचा मागोवा घेण्यात आला. काही अवशेष हे इराणी बनावटीच्या ड्रोनचे होते. त्यामध्ये अत्याधुनिक कॅमेरे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केलेली यंत्रणा, रेडिओ संंपर्क यंत्रणा सापडली. त्याचा प्रभावी वापर करुन रशियात बसून ड्रोनद्वारे हल्ले केल्याचे स्पष्ट झाले. जॅमर यंत्रणेचा वापर करुन अनेक ड्रोन निष्क्रिय केल्याचा दावा युक्रेनने केला. रशियाने हल्ल्यासाठी काळ्या रंगाच्या ड्रोनचा वापर केला. इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञानाने युक्त ड्रोनवर ते रशियन बनावटीचे असल्याचे स्टिकर लावले आहेत. मात्र, ते इराणी बनावटीचे असल्याचे तज्ज्ञ सांगतात. प्रथम ते इराणकडून मोठ्या प्रमाणात खरेदी केले. नंतर त्याचा वापर युद्धात केला. त्याच्या तंत्रज्ञानात बदल करुन ते लांबपर्यत उडत जावेत, अशी व्यवस्था केली. तसेच त्याची मारक क्षमता वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले. 
 

Related Articles