महिला कीर्तनकाराची हत्या चोरीच्या उद्देशानेच   

छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील महिला कीर्तनकाराची हत्या चोरीच्या उद्देशानेच झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.संगीता पवार असे हत्या झालेल्या कीर्तनकार महिलेचे नाव आहे. दगडाने ठेचून त्यांची हत्या करण्यात आली होती. सदगुरू नारायणगिरी आश्रम येथील मोहटादेवी माता मंदिरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या संतोष ऊर्फ भायला जगन चौहान आणि अनिल ऊर्फ हावडा नारायण विलाला दोन चोरट्यांनी त्यांची हत्या केल्याचे तपासात समोर आले आहे. 
 
या दोघांना मध्य प्रदेश सीमेवरून अटक करण्यात आली आहे. दोघेही मध्य प्रदेशातील राहणारे आहेत. ते वैजापूर तालुक्यातील गाढे पिंपळगाव परिसरामध्ये मजुरी करत होते. मोहटादेवी  मंदिरामध्ये ते चोरीच्या उद्देशाने  दरवाजाचे कुलूप तोडत होते. त्याचवेळी बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुनीता पवार या झोपलेल्या होत्या. त्या जागी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी डोक्यात मोठा दगड टाकून त्यांची हत्या केली. 

Related Articles